शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

उपवनसंरक्षकांचा लिलावाचा आदेश डावलला

By admin | Published: August 24, 2016 12:14 AM

कोका विश्रामगृहाचे निघालेले लाकुड साहित्य गडेगाव आगारात लिलाव करावे असे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनी बजावले होते.

प्रकरण कोका विश्रामगृहाच्या साहित्याचे : प्रकरण दडपण्याचा खटाटोप सुरूचप्रशांत देसाई भंडाराकोका विश्रामगृहाचे निघालेले लाकुड साहित्य गडेगाव आगारात लिलाव करावे असे आदेश तत्कालीन उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनी बजावले होते. या आदेशाला डावलून तेथील सर्व साहित्य भंडारा येथे बोलावून त्याची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी कोका विश्रामगृहाचे काम सुरु असताना त्यातून निघालेले सर्व लाकूड साहित्य एकत्र जमा करावे व ते गडेगाव आगारात आणून लिलाव करावा. लिलावातून मिळालेले पैसे वनविभागाच्या खात्यात जमा होईल असा त्यांचा उद्देश होता. मार्च महिन्यात काढलेल्या या पत्राची विद्यमान वनक्षेत्राधिकारी संजय मेश्राम यांनी पत्राची दखल न घेता त्यांचे आदेश डावलले. सर्व लाकूड साहित्य भंडारा येथे पाठवावे असे लेखी आदेश वनक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी कोका येथील वनपाल डब्लू. आर. खान यांना दिले. या आदेशानुसार खान यांनी शासकीय ट्रकने सर्व लाकूड साहित्य भंडाऱ्यात पाठविले. त्यानंतर या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. यातील काही साहित्य येथील शासकीय वसाहतीत लावण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. एकंदरीत लाकूड साहित्यामुळे वनविभागातील या अधिकाऱ्याचे अनेक प्रकरण आता वनकर्मचाऱ्यांमध्ये चर्चिली जात आहे. मेश्राम यांची कोका येथे भ्रमंतीमागील दोन दिवसांपासून लोकमतमध्ये कोका येथील विश्रामगृहाच्या लाकडांची मालिका प्रकाशित झाली. आजही प्रकाशित झालेले वृत्त वाचल्यानंतर त्यांनी सकाळी १०.३० वाजता ‘मुढ फ्रेश’ करण्याकरिता कोका वनविभागाचे कार्यालय गाढले. तेथील कर्मचाऱ्यांसह त्यांनी दुपारी १२.३० पर्यंत कोका अभयारण्यात भ्रमंती करून दुपारी भंडारा येथे पोहचले.लिपिकाला खडेबोल सुनावलेवनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांचे प्रकरण ‘लोकमत’ने प्रकाशित केले. दरम्यान त्यांनी बदलीसाठी अर्ज सादर केला. या बाबीची पुष्टी करण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने मेश्राम यांना विचारणा केली. यावर त्यांनी संबंधित लिपिक गणवीर यांना सोमवारी सायंकाळी भ्रमणध्वनीवरून चांगलेच खडे बोल सुनावल्याची चर्चा आज दिवसभर वनविभागात सुरु होती. लिलावाबाबत उपवनसंरक्षकांचे पत्र होते. सर्व साहित्याची लिलावाची परवानगी मिळाली. मात्र त्यानंतर क्वॉटरला लाकूड साहित्य लागत असल्याने सर्व साहित्य भंडारा येथे बोलाविले. माझे काम इमाने इतबारे सुरु आहे. मात्र माझ्यावर ताशेरे ओढल्या जात आहे. चोरी जात असल्याने यातील साहित्य माझ्या क्वॉर्टरमध्ये ठेवण्यात आलेले आहे. - संजय मेश्राम,वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा.