लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.देशात अग्रगण्य समजली जाणारी व देशाला युध्दासाठी लागणारी कच्ची सामुग्री येथील आयुध निर्माणी भंडारा येथे तयार करण्यात येतो. आयुध कारखाना ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापर्यंत आयुध निर्माणी रस्त्याच्या दुतर्फा शंभरफुट जागा आयुध निर्माणी मालकीची आहे. दोन्ही बाजुला तीन ते चार फुट उंच सिमांकन दगड लावलेला आहे. या जागेवर कच्चे व पुर्ण पक्के बांधकाम खासगी व्यक्तींना करण्यास मनाई आहे.मात्र जवाहरनगर वसाहत ते ठाणा राष्ट्रीय महामार्गपर्यंत पानटपरी धारकांनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले. काहीनी तर चक्क झोपडी तयार करुन दुसऱ्यांना जास्त किरायाने आपली पानटपरी व झोपडी दिलेली होती. या झोपडीमुळे आयुध निर्माणीतील भविष्यात असामाजिक तत्वाची व्यक्ती समुहापासून धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली होती. देशातील परिस्थिती पाहता आयुध निर्माणी प्रशासनाने योग्य पाऊल उचलून अनधिकृतरित्या पानटपरी व झोपडी हटविण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारला प्रशासनाकडून कारवाई होण्यापुर्वीच अनधिकृत पानटपरी धारकांनी सावधगीरी बाळगून आयुध निर्माणी जागेवरून अतिक्रमण हटविले. आयुधी प्रशासन मंगळवारला सकाळी ११.३० वाजता सुमारास ठाणा पेट्रोलपंप टी पॉर्इंट येथे आले असता रस्त्यालगत असलेले चार फुट उंचीचे सिमेंटचे पाईप रस्त्याच्या दूर केले. हे सिमेंट पाईप १० वर्षापासून याच ठिकाणी रस्त्यालगत पडून होते. यामुळेच ठाणा येथील माजी सरपंच शिवदास उरकुडे यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन अपघात झाले. प्रशासनाने येथील पाईप व अनधिकृत झोपटी पानटपरी हटविल्याने नागरिकांनी आयुध प्रशासनाचे आभार मानले. मात्र आयुध प्रशासनाची परवानगी घेऊन आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह आयुध निर्माणीच्या नियमानुसार करणाऱ्या पानटपरी, अल्पोपहार विके्रत्यांना नाहक बळी पडावे लागले.
आयुध निर्माणी प्रशासनाने हटविले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 9:52 PM
ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.
ठळक मुद्देठाणा ते जवाहरनगर : सुरक्षेच्या कारणांवरुन अनेकांनी काढले स्वमर्जीने अतिक्रमण