लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी गुरुवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांधी चौक स्थित यूनियन बँकेमागील बचपन अ- प्ले स्कूल येथे आयोजित केले आहे.या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. शिबिरात दिलेल्या वेळेत सहभागी होता येईल. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी, खासगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करू शकतात. नागपुरच्या हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अशोक पत्की व त्यांची चमू रक्त संकलनासाठी सहकार्य करतील. अधिक माहितीकरिता संयोजक ललीत घाटबांधे, (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.लोकमत सखी मंच वाचकांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.शासन नियमांचे पालनबाबूजींच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे. त्यात फिजीकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी आरोग्यविषयक सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येणार आहे.
बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:00 AM
बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.
ठळक मुद्देउपक्रम : लोकमत व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सेंटरचा पुढाकार