साकोली : शहरातील सर्वात जुने श्री गणेश मंदिर चौक गणेश वाॅर्डात वर्षानुवर्ष जुनी परंपरागत भरत असलेला तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. लाकडी नंदी बैल घेऊन आलेल्या ७० ते ८० बालकांना आशिष गुप्ता व विनायक देशमुख यांच्यातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रभाग ०७ येथे गणेश मंदिर चौकात तान्हा पोळा भरविण्यात आला. श्री गणेश मंदिरात अशोक गुप्ता यांनी महाआरती करून सर्व बालगोपाळांना प्रसादाचे वितरण केले. याप्रसंगी पार्थ घोनमोडे यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले, आयोजनात बालगणेश उत्सव मंडळातील राजू देशमुख, शुभम देशमुख, संदीप गुप्ता, विजय जैन, नचिकेत कुलकर्णी, आशिष चेडगे, सुरज डुंभरे, आशिष कापगते, लोकेश देशमुख, नामदेव शेंडे, राहुल अंदूलकर, मंगेश डुंभरे, मोहित रंगारी, बलराज नंदेश्वर, प्रशांत अंदूलकर, अमेय डुंभरे, सुनील डुंभरे, सोनू टिकेकर, शुभम डुंभरे, आदित्य चेडगे, अमित डुंभरे, चेतन देशमुख, मयूर देशमुख व सर्व बाल गणेश उत्सव मंडळातील सदस्यांनी सहकार्य केले.
साकोली येथे तान्हा पोळ्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:42 AM