२१ जानेवारी रोजी आयोजित भित्तीचित्र स्पर्धेत ओला व सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छ लाखांदूर सुंदर लाखांदूर , सेनो टू प्लास्टिक, कोविड-१९ व स्वच्छता व माझी वसुंधरा (जमीन, पाणी, आकाश, वायू, अग्नी) आदी विषयांवर भित्तीचित्र काढले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना स्वत:च्याच साहित्याचा वापर करावयाचा आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे दोन हजार, द्वितीय बक्षीस पंधराशे रुपये व तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये याप्रमाणे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. २२ जानेवारी रोजी आयोजित टाकाऊपासून टिकाऊ स्पर्धेत प्लास्टिक पुनर्वापर, पेपर व पुठ्ठा आदी टिकाऊ वस्तू निर्माण करणे अपेक्षित आहे. या स्पर्धेतदेखील प्रथम क्रमांकाला पंधराशे रुपये, द्वितीय क्रमांकाला एक हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला पाचशे रुपये व प्रमाणपत्र अशी पारितोषिके दिली जाणार आहेेत. स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन येथील लाखांदूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे यांनी केले आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:30 AM