लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेना रुग्णसंख्येच्या स्फाेटासाेबतच आता मृत्यूचे तांडवही सुरू झाले असून, शुक्रवारी तब्बल १३ जणांचा काेराेनाने बळी घेतला. यात ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये एकट्या भंडारा तालुक्यातील सातजणांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५१ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी काेराेना मृत्यूची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३९४ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात दरराेज हजारांवर रुग्ण संख्या येत असून, मृत्यूचा आकडाही वाढत आहे. शुक्रवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ७, तुमसर आणि पवनी तालुक्यातील प्रत्येकी दाेन, तर लाखांदूर आणि माेहाडी तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुषाचा भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसाेलेशन वाॅर्डात, ८० वर्षीय महिला आणि ६२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात, ७४ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला आणि ५७ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसाेलेशन वाॅर्डात मृत्यू झाला, तर तुमसर तालुक्यातील एका ७० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात, तर ३३ वर्षीय तरुणाचा रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील ५० वर्षीय महिला आणि ५६ वर्षीय पुरुषाचा भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात आणि माेहाडी तालुक्यातील ७० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच मृतांची संख्या दाेन आकड्यात माेजली गेली. १ एप्रिल राेजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला हाेता. २ एप्रिल राेजी तिघांचा, ३ एप्रिलला चार, ४ एप्रिल राेजी एक, ५ एप्रिल राेजी नऊ, ६ एप्रिल राेजी आठ, ७ एप्रिलला नऊ, ८ एप्रिल राेजी तीन, शुक्रवार ९ एप्रिल राेजी तब्बल १३ जणांचा बळी गेला.
शुक्रवारी १२१७ पाॅझिटिव्ह भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा काेराेना बाधितांच्या संख्येने हजारचा आकडा पार केला. ९ हजार २२० व्यक्तींची चाचणी केल्यानंतर १२१७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा ३८८, माेहाडी १४१, तुमसर २१८, पवनी २०७, लाखनी १३९, साकाेली ५२ आणि लाखांदूर तालुक्यातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३३ हजार ९८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात २५ हजार ८२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार ७३१ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली असून, ३९४ व्यक्तींचा काेरेानाने बळी घेतला.
स्मशानभूमीत धगधगतात चिताकाेराेनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी भंडारा लगतच्या गिराेला येथे काेविड स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. दरराेज येथे चिता धगधगत असल्याचे दिसून येते. याठिकाणी एकावेळी १४ मृतांवर अंत्यसंस्काराची सुविधा आहे. आता दरराेज मृत्यूचा आकडा वाढत असल्याने अंत्यसंस्कार करण्यास अडचण येत आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारित असलेल्या या स्मशानभूमीत नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना नियमानुसार मृतांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.