जिल्ह्यात शनिवारी ६०२८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १२४० व्यक्ती बाधित आढळून आल्या असून, त्यामध्ये भंडारा तालुका ६१४, मोहाडी ६५, तुमसर १४०, पवनी १०९, लाखनी १५१, साकोली ६१, लाखांदूर १०० रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६ हजार ३५५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येसोबतच बळींची संख्याही वाढत असल्याने सर्वत्र नागरिक भयभीत झाले आहे.
बॉक्स
१२ हजार ६६९ ॲक्टिव्ह रुग्ण
भंडारा जिल्ह्यात शनिवारी १२ हजार ६६९ रुग्ण ॲक्टिव्ह असल्याची नोंद करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ५१७१, मोहाडी १०४०, तुमसर १४६३, पवनी १६६५, लाखनी १३३३, साकोली ११२४ आणि लाखांदूर तालुक्यात ८७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बॉक्स
सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात करण्यात आली. या तालुक्यात आतापर्यंत २६२ जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. मोहाडी तालुक्यात ४७, तुमसर ७५, पवनी ६०, लाखनी ३२, साकोली ३४ आणि लाखांदूर तालुक्यातील २३ जणांचा समावेश आहे.
बॉक्स
गिरोला स्मशानभूमीत धगधगतात चिता
कोरोना बळींवर अंत्यसंस्काराची सुविधा भंडारालगतच्या गिरोला येथे आहे. या ठिकाणी दररोज २० ते २५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. २४ तास येथे चिता धगधगत असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींना या धगधगत्या चिता दिसतात, तेव्हा प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढतात. या ठिकाणी दररोज दोन ट्रक लाकडे अंत्यसंस्कारासाठी लागत असल्याची माहिती आहे.