जिल्हाधिकारी : साकोली व लाखांदूर तालुक्यात जलयुक्त शिवार कामांची केली पाहणीभंडारा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अपूर्ण आढळून आलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देवून जे कंत्राटदार कंत्राट घेऊनही काम व्यवस्थित करत नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिले.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साकोली व लाखांदूर तालुक्यातील कृषि विभाग व इतर यंत्रणाकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. साकोली तालुक्यातील पाथरी येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषि विभागाची पूर्ण झालेली भातखाचर पुर्नजीवनाच्या कामाची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेल्या पाटचारी दुरुस्तीचे कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मनरेगाची मजुरी वेळेत मिळते का? याविषयी मजुरांना विचारणा केली. पुरविण्यात येत असलेल्या सुविधा विषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर मग्रारोहयो अंतर्गत घेण्यात आलेल्या मौजा पाथरी येथील विहिरींची पाहणी केली. पाथरी वनक्षेत्रात वन विभागामार्फत घेण्यात आलेलया वनतलावांची सुध्दा जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जाभंळी (खांबा) येथे कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामांची पाहणी करुन काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सुनिता पटले व मोडकु ठाकरे यांच्या शेततळयांची पाहणी केली. जांभळी गावातील सुरु न झालेली कामे कंत्राटदाराने तात्काळ सुरु करावी. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करावीत अन्यथा कंत्राटदारांना देयके अदा करु नयेत. सदर कंत्राटदारांना नोटीस बजावून जे वेळेत काम करणार नाहीत, अशा कंत्राटदारांना काळया यादीत टाकून त्यांना यापुढे कामे देण्यात येवू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषि विभागामार्फत योजनांची माहिती दिली जाते का, कृषि सहाय्यक नियमितपणे गावास भेटी देतो का, गाव बैठकीचे आयोजन करण्यात येते का, या विषयी विचारणा केली. त्यानंतर वन विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या माती नाला बांध कामांची पाहणी केली. मालुटोला गावातील मामा तलाव दुरुस्त करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याने सदर माजी मालगुजारी तलावाची ग्रामस्थांसोबत पाहणी करुन लघु पाटबंधारे विभाग यांनी घेतलेल्या सिमेंट नाला बांधाची तावशी येथे भातखाचर पुर्नजीवन, कृषि विभागाच्या दोन नाला खोलीकरण, आसोला गावातील हिरालाल भैय्या यांचे शेततळे, कुडेगाव येथील स्थानिक स्तर गोंदिया व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे यंत्रणेमार्फत घेण्यात आलेल्या सिमेंट बांधाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उाविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, उपविभागीय कृषि अधिकारी एस.के. सांगळे, साकोलीचे तहसिलदार खडतकर, तालुका कृषि अधिकारी जी. के. चौधरी, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. बी. इखार, लाखांदूरचे तहसिलदार विजय पवार, लाखांदूर तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम, वनपरिक्षेत्र अधिकारी येसनसुरे, नायब तहसिलदार खोत तसेच स्थानिक स्तर कार्यालयातील अधिकारी व यंत्रणांचे अधिकारी व क्षेत्रिाय कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अन्यथा दोषी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई
By admin | Published: May 25, 2016 1:21 AM