महेंद्र निंबार्ते यांचा इशारा : म्हाडा कॉलनीत दूषित पाणी पुरवठा प्रकरण, महिनाभरापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यातभंडारा : येत्या तीन दिवसात म्हाडा वसाहतीत दूषित पाणी पुरवठाबाबत समाधान झाले नाही तर, तेच दूषित पाणी मुख्याधिकाऱ्यांना पाजण्यात येईल. या प्रकरणाची भंडारा नगर परिषदेने दखल घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हाडा कॉलनीतील जनता आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी दिला आहे.शहरातील नागरिकांचे दुषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. म्हाडा कॉलोनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्याकडे नागरिकांनी केली. त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता तत्थ्य आढळून आले. शहरातील पाणी पुरवठ्याकरिता पहिल्यांदा १,९०० मध्ये म्हणजे ११६ वर्षी पाण्याच्या टाकीचे निर्माण करण्यात आले. शहराचे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९८५ ला दुसरी तर १९९६ ला तिसरी पाण्याची टाकी बनविण्यात आली. भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. दोन्ही टाक्यामुळे नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. अनेक वेळा दूषित पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. नाग नदीच्या सांडपाण्यामुळे वैनगंगेचे पाणी अधिक दूषित झाले आहे. या माध्यमातून नागपूर महानगर पालिकेने नागनदी जलशुध्दीकरण प्रकल्प सुरु करावे असे आवाहन निंबार्ते यांनी केले होते. या समस्येवर तोडगा निघाला नाही तर तेच दूषित पाणी मुख्याधिकाऱ्यांना पाजण्यात येईल. या प्रकरणाची गंभीर दखल भंडारा नगर परिषदेने घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हाडा कॉलनीतील जनता आंदोलन करेल, असा गर्भित इशाराही प्रकाश नवखरे, भरणे, चकधारे, मुटकुरे, खोटेले, वाघाये, कोल्हे, गोमासे, सूर्यवंशी, बावणे, सरोदे, शेख, महादेव वंजारी, प्रफुल झंझाड, वैरागडे, सोरखे, वनवे यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार
By admin | Published: March 30, 2016 12:56 AM