लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी अंतर्गत येत असलेला जुना बस स्टँड ते खापाटोली येथील गंज मार्केटपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. त्या रस्त्याचे १५ दिवसात नुतनीकरण झाले नाही तर खड्ड्यांना व रस्त्यांना पंतप्रधान, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्री, राज्यातले मंत्री, स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्ष यांची नावे देणार असल्याचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसने दिला आहे.शहराच्या हार्ट आॅफ द सिटी समजल्या जाणाºया खापा टोली परिसरातून जुना बसस्टॅड ते गंज मार्केट भंडारा रोड गेलेला आहे. याच रस्त्यावरती अनेक दवाखाने, नवीन बस स्टँड, शाळा महाविद्यालये व अनेक दुकानेही आहेत. त्याच बरोबर भंडारा नागपुर रोडही तिथुनच आहे. त्यामुळे रस्त्यावरची रहदारी वाढली आहे. मात्र गत दोन वर्षापासून हा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मोहाडीने हेतुपुरस्पर दुर्लक्षच केले व स्थानिक लोकप्रतिनिधीनेही दुर्लक्ष केले. परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे नुतनीकरण न करता डांबरी रस्त्यावर मुरुमाचे लेप लावून वेळ मारुन नेत गेले. पंरतु त्या टाकलेल्या मुरुमाच्या धुळीमुळे संपूर्ण परिसरच धुळयुक्त झाला असून त्यांचा तुमसरकराच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. किमान नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून येत्या १५ दिवसात सदर रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे अन्यथा राष्टÑवादी भव्य आंदोलन उभारुन खड्डे व रस्त्याचे नामकरण करुन मंत्र्यांचे नाव देणार असल्याचा इशारा निवेदनामार्फत संबंधित विभागास देण्यात आला.निवेदन देतेवेळी महिला राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे, मधुकर कुकडे, विजय डेकाटे, शुभांगी राहांगडाले, विठ्ठल कहालकर, उमेश तुरकर, राजु माटे, चंदु कटारे, पमा ठाकरे, प्रेरणा तुरस्कर, गिता माटे, मिना गाढवे, सांकेत गजभिये व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अन्यथा तुमसरातील खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:16 PM
सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी अंतर्गत येत असलेला जुना बस स्टँड ते खापाटोली येथील गंज मार्केटपर्यंतचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा : १५ दिवसात रस्त्याचे नुतनीकरण करण्याची मागणी