शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

जिल्ह्यातील २८७ पैकी २५९ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 4:00 AM

मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून २८ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत २८७ पैकी २५९ नमूने निगेटिव्ह आलेले आहेत.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त रुग्ण नाही : ८४ व्यक्तींना विलगीकरण कक्षातून सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सुदैवाने अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नसून आतापर्यंत नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या २८७ नमुन्यांपैकी २५९ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २८ अहवालांची प्रतीक्षा आहे.कोरोना संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २५ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ८४ जणांना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ३६ व्यक्ती भरती असून १५२ व्यक्तींना त्यामधून सुटी देण्यात आली आहे.मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून २८ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत २८७ पैकी २५९ नमूने निगेटिव्ह आलेले आहेत.जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाय योजना केल्या जात असून गावपातळीवर आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र श्वासदाह रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर बाहेरून येणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी केली जाते. प्रत्येक चेकपोस्टवर वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा अहोरात्र पाहारा असतो. जिल्ह्यातील नऊ शासकीय वसतीगृहात सेल्टरहोम तयार करण्यात आले आहेत. मजूर आणि स्थलांतरीत लोकांची त्या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गत महिनाभरापासून तेथे अनेक मजूर मुक्कामी आहेत. या सर्वांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ्ज्ञामार्फत नियमित तपासणी केली जाते. तसेच त्यांना योगा प्रशिक्षणही देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, अनावश्यक घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.विलगीकरण कक्षातील ‘त्या’ वृद्धेचा अहवाल निगेटिव्हश्वसनाचा त्रास होत असल्यामुळे २१ एप्रिल रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या एका ८० वर्षीय वृद्धेचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. सदर वृद्धेला मधूमेह, उच्च रक्तदाब व दीर्घकाळ अवरोधी फुफ्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले आहे. वृद्ध महिेलेचा घश्यातील नमुना तपाणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. यापुर्वीसुद्धा दोघांचा विलगीकरण कक्षात मृत्यू झाला होता. त्यांचेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधीत रुग्ण नसून प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.जिल्हाधिकाऱ्यांची साकोली रुग्णालयाला भेटकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साकोली उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संदर्भात काय उपाययोजना केल्या याची माहिती घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना विविध सूचना केल्या.तीव्र श्वासदाहचे ६९ व्यक्ती दाखलजिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात फल्यू ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत श्वसनाचा तीव्र आजार असलेल्या ६९ व्यक्तींना येथे भरती करण्यात आले असून यापैकी ६८ व्यक्तींचे घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह असून सहा व्यक्तींचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन कक्ष ठेवण्यात आले आहेत. गावपातळीवर घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत रुग्णांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या