पावसाळा सुरू झालेला आहे. कमी-जास्त पावसाची हजेरी दररोज लागत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सुद्धा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजार बळावले आहेत. ग्रामीण भागात डबक्यांचे प्रमाण अधिक असल्याने डासांची उत्पत्ती अधिक असते.
विषमज्वरचे रुग्ण पालांदूर परिसरात अनुभवायला मिळाले आहेत. यात रुग्णांचे ७२ तासांपर्यंत ते ताप येत असल्याने कोरोनाची आठवण ताजी होत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या मंदावलेली आहे. बोटावर मोजण्याइतकीच रुग्णसंख्या सातही तालुक्यात अनुभवायला येत आहे. मात्र दुसऱ्या लाटेने दिलेले अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. त्यामुळे थोडासा सुद्धा ताप आला तरी अख्खा परिवार जागृत होऊन कोरोना या जीवघेण्या वायरसची आठवण होते.
बॉक्स
नियंत्रणाकरिता हे करा
दररोज पाणी उकळून थंड करून प्यावे, शिळे , उघड्यावरचे अन्न खाऊ नये, पावसात भिजू नये, डास निर्मूलनासाठी प्रयत्न करावे, ताप अंगावर काढू नये, ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अंगभर कपडे वापरावे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, सकस आहार घ्यावा, मास्कचा वापर असावा, साबणाने वारंवार हात धुवावे, नियमित संतुलित पिण्याचे पाणी अधिक प्यावे, लिंबू शरबत सारखे पेय घ्यावे, वारंवार नाका तोंडाला स्पर्श करू नये.
प्रतिक्रिया
आठवडाभरापासून पालांदूर परिसरामध्ये विषाणूजन्य आजाराचे रुग्ण संख्या वाढत आहे. वायरल फीवर असल्याने काळजी करण्याचे कारण नसले तरी सावधगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेत उपचार महत्त्वाचे आहेत.
डॉ. अभय पालांदूरकर
जनरल फिजिशियन, पालांदूर