तुमसर : दुसऱ्या लाटेचे दाहक वास्तव अनुभवल्यानंतर आता आराेग्य यंत्रणा तिसरी लाट राेखण्यासाठी सज्ज झाली आहे. ग्रामीण भागात आराेग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात असून तुमसर तालुक्यात ऑक्सिजन प्लांटसह, सुसज्ज रुग्णालय ऑक्सिजन बेड व प्रत्येक उपकेंद्रात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. काेणत्याही परिस्थितीत काेराेनाची तिसरी लाट गावच्या सीमेवरच राेखायची असा निश्चय तालुका प्रशासन व आराेग्य यंत्रणेने केला आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत तुमसर तालुक्यात माेठ्या प्रमाणात काेराेना रुग्ण आढळून आले हाेते. याेग्य नियाेजन करुनही माेठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने आराेग्य यंत्रणेची त्रेधा उडाली हाेती. आता हा अनुभव पाठीशी असल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ग्रामीण भागासह उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज ठेवण्यावर भर दिला जात आहे.
तुमसर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, पाच प्राथमिक आराेग्य केंद्र, ३७ आराेग्य उपकेंद्र आहेत. पहिल्या लाटेत उपजिल्हा रुग्णालयात ३५ बेड काेराेनासाठी उपलब्ध करून देण्यात आले हाेते. काेराेनाची चाचणीही येथेच करण्यात येत हाेती तर प्राथमिक आराेग्य केंद्र आणि उपकेंद्रात रुग्णाची तपासणी करुन दिली जात हाेती. तुमसर तालुक्यात पहिल्या लाटेत सुमारे १५०० रुग्णांची नाेंद करण्यात आली. मात्र दुसऱ्या लाटेत संपूर्ण आराेग्य यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत हाेते. गावागावात रुग्ण आढळून येत हाेते. उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटाही अपुऱ्या पडत हाेत्या. हा अनुभव पाठीशी असल्याने आता तिसऱ्या लाटेसाठी आराेग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
बाॅक्स
तुमसर येथे ऑक्सिजन प्लांट
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला हाेता. ऑक्सिजनसाठी प्रत्येकाची दमछाक हाेत हाेती. हा प्रकार टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारला जात आहे. रुग्णांना सेंट्रलायझेशन प्रणालीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासाेबतच देव्हाडी, चुल्हाड, नाकाडाेंगरी, लेंडेझरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रत्येकी पाच ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. ३७ उपकेंद्रातही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर पुरविण्यात आले आहे.
बाॅक्स
तीन खाजगी काेविड केअर सेंटर
तुमसर तालुक्याची लाेकसंख्या पाहता शासकीय यंत्रणा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शहरात तीन खासगी काेविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली असून त्यात एक लहान मुलांसाठी काेविड केअर सेंटर आहे. यामुळे अनेकांना वेळेवर सुविधा मिळणार आहे.
बाॅक्स
लहान मुलांसाठी अद्याप निर्देश नाही
काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धाेका असल्याचे सांगितले जात आहे. परंतु तुमसर तालुक्यात शासकीय आराेग्य यंत्रणेला मुलांच्या काेराेना नियाेजनाबाबत अद्याप निर्देश प्राप्त झाले नाही. काेराेना लागण झालेल्या मुलांसाठी उपजिल्हा रुग्णालयात चाईल्ड सेंटर उभारले जाऊ शकते.
काेट
तिसऱ्या लाटेसाठी आराेग्य यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट व बेडची सुविधा वाढविण्यात येत आहे. लहान मुलांच्या उपचाराबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उपचार करण्यात येतात.
डाॅ. एम. ए. कुरेशी
तालुका आराेग्य अधिकारी तुमसर