शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 5:00 AM

जिल्ह्यात सर्वत्र कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनचीही निकड असते. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला. विविध ठिकाणावरून ऑक्सिजनचे सिलिंडर्स बोलावून रुग्णांचे प्राण वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र बाहेरून येणारा सिलिंडर्स वेळेवर कामी पडेलच याची खात्री नसते. त्यामुळेच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारला.

ठळक मुद्दे५०० क्युबीक मीटर क्षमता : २४ तासात ११० जम्बो सिलिंडर्स ऑक्सिजन निर्मिती

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोणताही रुग्ण प्राणवायूविना तडफडून मरू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प सोमवारी कार्यान्वित करण्यात आला. ५०० क्युबिक मीटर क्षमता असलेल्या या प्रकल्पातून २४ तासात ११० जम्बो सिलिंडर्स भरले जाणार आहेत. थेट सेंट्रलाइज प्रणालीद्वारे आयसीयू आणि आयसोलेशन वाॅर्डात ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात सर्वत्र कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनचीही निकड असते. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला. विविध ठिकाणावरून ऑक्सिजनचे सिलिंडर्स बोलावून रुग्णांचे प्राण वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र बाहेरून येणारा सिलिंडर्स वेळेवर कामी पडेलच याची खात्री नसते. त्यामुळेच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारला. केंद्र सरकारच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अतिशय कमी वेळात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.जिल्हा सामान्य रुग्णालयात यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ५०० क्युबिक मीटर ऑक्सिजन  निर्मितीची या प्रकल्पाची क्षमता आहे. २४ तासात ११० जम्बो सिलिंडर्स भरू शकेल एवढा ऑक्सिजन येथे निर्माण केला जाणार आहे. सोमवारी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला तेव्हा १२ तासात ५० सिलिंडर्स भरण्यात आले. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयावर असलेला ऑक्सिजन पुरवठ्याचा ताण कमी झाला आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करणे यामुळे सहज शक्य झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पातून सेंट्रलाइज प्रणालीद्वारे ऑक्सिजन थेट आयसीयू आणि आयसोलेशन वाॅर्डात पुरविला जाणार आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे रुग्णालयातील यंत्रणेवरचा ताण कमी होऊन योग्य उपचार करणे सहज शक्य होणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना आले यश संवेदनशील म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येक बाबीवर नजर ठेवून आहेत. प्रशासनाला मार्गदर्शनासोबतच अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून हा ऑक्सिजन प्रकल्प अगदी कमी वेळात कार्यान्वित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

ऑक्सिजनची रुग्णांना नितांत गरज असते. हा प्रकल्प अशा रुग्णांना दिलासा देणारा ठरणार आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पातून अहोरात्र ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मितीची चाचणी यशस्वीपणे पार पडली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनसाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही.-साहेबराव राठोड, नोडल अधिकारी तथा अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय

वीज गेली तरी ऑक्सिजन पुरवठा सुरू राहणार जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला तरी रुग्णांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा थांबणार नाही. येथे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वीजपुरवठा खंडित ते जनरेटर सुरू करणे या पाच ते दहा मिनिटांच्या अवधीतही रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी ड्युरा सिलिंडर्सची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सेंट्रलाइज पाइपलाइनच्या माध्यमातून ड्युरा सिलिंडर्समधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना २४ तास ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचेही मोठे सहकार्य लाभले आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.नाईक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.निखील डोकरीमारे यांचे सहकार्य महत्वाचे ठरले. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलOxygen Cylinderऑक्सिजन