संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे. मृगधारा वेळेवर बरसल्या तर शेतशिवारात पऱ्हे टाकण्याची लगबग वाढणार आहे. मात्र हवामान खात्याने मान्सून लांबणार असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी मात्र सध्या चिंतेत दिसत आहे. मशागतीच्या कामांना वेग आला असला तरी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून शनिवारी लागणाºया मृग नक्षत्रावर सर्वांच्या आशा आहेत.भंडारा जिल्हा भातासाठी प्रसिध्द आहे. या पिकाला मुबलक पावसाची आवश्यकता असते. रोहिणी नक्षत्र पुर्णत: कोरडे गेले आहे. जिल्ह्यात १ ते ६ जूनपर्यंत साधारणत: ४९.१ मिमी पावसाची नोंद केली जाते. परंतु आतापर्यंत पावसाची सरही कोसळली नाही. दररोज सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होतात आणि वाºयाच्या वेगासोबत निघून जातात. आता ८ जूनपासून मृग नक्षत्र लागत आहे. मृग नक्षत्रातील पाऊस पिकासाठी पोषक मानला जातो. या काळात जोरदार पाऊस बरसला तर शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता मृगात पाऊस दगा देत असल्याचे दिसत आहे.दरवर्षीच्या दृष्काळ झेलत शेतकरी गत काही दिवसांपासून ४६ अंश तापमानातही शेतात मशागतीचे कामे करीत आहे. शेतातील धुरे पेटविणे, धुऱ्यावर माती टाकणे, शेतातील नागरलेले शेत सपाट करणे, कुळवाची फाळी टाकणे अशा कामात शेतकरी व्यस्त आहे. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे याच पिकावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबुन असते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांशी भात शेतीची कामे पुर्णत्वास गेली असून ओलीताची सोय असलेल्या पºहेही टाकण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये तसेच लागवडही करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र काही शेतकरी ओलीताच्या भरवशावर पºहे टाकत असल्याचे चित्र आहे. तर काही शेतकरी बाजारात बियाण्यांची चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे.भात शेतीचे क्षेत्र घटतेभंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. मात्र अलिकडे भात शेतीचे क्षेत्र घटत असल्याचे दिसत आहे. शेतकरी इतर पिकाकडे वळत आहे. भातातून अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. रासायनिक खतांचे वाढलेले भाव, बियाण्यांच्या किंमती आणि शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या धानाला मिळणारा कमी भाव यामुळे आता शेतकरी भाताऐवजी पर्यायी पिकाचा विचार करतांना दिसत आहे. अनेक शेतकरी आता तुर, सोयाबीन पिकाकडे वळल्याचे दिसत आहे.
मशागतीला वेग पण शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:14 AM
अंगाची काहीली करणारे ४६ अंश सेल्सीअसपर्यंत तापमान सोसल्यानंतर आता मृगधारा झेलण्याची आस धरतीला लागली आहे. रोहिणी नक्षत्राने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वांची आस मृग नक्षत्रावर आहे.
ठळक मुद्देरोहिणी नक्षत्र गेले कोरडे : मृगधारा झेलण्याची धरतीला लागली आस