लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनसोक्त गावठी दारु प्राशन करण्यासाठी भंडारा लगतच्या संगम येथे तळीरामांचा पोळा भरल्याचे दृष्य पाडव्याला दिसून आले. मिनरल वॉटरच्या बॉटलमध्ये पहिल्या धारेच्या हातभट्टीची दारु पॅकींग करून खुलेआम विकली जात होती. दिवसभरात हजारो लिटर दारु विकली गेल्याचे पुढे आले. मात्र कोणत्याही पोलीस पथकाने येथे धाड मारली नाही.श्रावण महिना संपताच तळीरामांची पावले दारु अड्ड्याकडे वळली. गेल्या सव्वा महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या तळीरामांनी भंडारा लगतच्या संगम येथे मोठी गर्दी केल्याचे दृष्य पाडव्याला दिसत होते. बेला, मुजबी, दवडीपार, गणेशपूर, फुलमोगरा, शहापूर, कवडसी, पिंपरी, जाख, उमरी, सालेबर्डी यासह इतर गावातील अनेक जण या हातभट्टीवर दारु पिण्यासाठी येत होते. मात्र कोरोना संसर्गाने त्याठिकाणी दारु विकण्याऐवजी पार्सल दिली जात होती.यासाठी मिनरल वॉटरच्या बॉटल्स रिकाम्या बाटलांचा उपयोग केला जात होता. देशी, विदेशी दारु महाग पडत असल्याने अनेक जण गावठी दारुचा आधार घेतात.दारुचा साठा लपविला काटेरी झुडूपातपाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील काटेरी झुडूपे, सांडपाण्याची गटारे आणि तणसाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवली होती. ग्राहक आल्यानंतर त्याला मिनरल वॉटरच्या बॉटलमधून थेट पार्सल देत होते. या सर्व प्रकारात पोलिसांनी कितीही छापा मारला तरी त्यांच्या हाती बोजाराशिवाय काहीच लागत नाही, असे गावकरी सांगत होते.अन् कोरोनाची खबरदारीसध्या कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता दारु विक्रेत्यांसह मद्यपींनीही खबरदारी घेतली. ग्लासांमधील दारु प्राशन केल्यास संसर्ग होऊ शकतो म्हणून मिनरल वॉटरच्या बॉटलचा उपयोग करण्यात आला. कोरोनाची धास्ती असतानाही विशेष खबरदारी घेत दारु प्राशन करणे मात्र कुणीही सोडले नसल्याचे दिसत होते. तर दुसरीकडे पोलिसांनी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बंदोबस्त लावला होता. विविध पथके गठीत करण्यात आली होती. मात्र कुणाचेही लक्ष या दारु अड्ड्याकडे नव्हते.
मिनरल वॉटरच्या बॉटलमध्ये हातभट्टीच्या दारुचे पॅकींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 5:00 AM
पाडव्याला दारु पिणाऱ्यांची संख्या मोठी राहणार, हे गृहीत धरून विक्रेत्यांनी आधीपासूनच माच टाकला होता. कुणालाही दारु कमी पडणार नाही यासाठी गेली आठ दिवसापासून जय्यत तयारी केली होती. हजारो लिटर दारु गाळल्यानंतर पोलिसांच्या भीतीने ही दारु संगम परिसरातील काटेरी झुडूपे, सांडपाण्याची गटारे आणि तणसाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवली होती. ग्राहक आल्यानंतर त्याला मिनरल वॉटरच्या बॉटलमधून थेट पार्सल देत होते.
ठळक मुद्देसंगमावर तळीरामांची गर्दी : पाडव्याला हजारो लिटर दारुची विक्री