लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौरास) : पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी उन्हाळ्यामध्ये हिरवेगाव दिसणारे शेत दिसेनासे झाले असून भात शेतकऱ्यांना धानाचे पऱ्हे (नर्सरी) जगवणे कठीण झाले आहे.भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदी वाहते. तीच नाळ चौरास भागाशी जुळली आहे. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हा महत्वाकांक्षी प्रकल्प झाला आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून चौरास भागात विहिरीला पाणी पुरवठा होणारा प्रवाह धरणाच्या पाळीचे बांधकाम करण्यात आले. येथूनच चौरास भागातील शेतीला घरघर लागली. कालांतराने नदीचा प्रवाह बदलला गेला. तरीही जमीनीच्या आतमध्ये वैनगंगा नदीच्या भूमिगत प्रवाह चौरास परिसरात सुरु होता.चौरास भागात मोठ्या प्रमाणावर जलसाठा होता. त्यामुळे शेतकरी जेथे विहिर खोदेल तेथे जलसाठा मिळत होता व कृषी पंप चालत होते. सर्वात जास्त विद्युत पंप आता ही चौरास भागात आहेत. पण आता बंद पडलेले आहेत. यापुर्वी खरीप धान, रबी डाळ वर्गीय पिके, रबी धान या तिन्ही फसली शेतकरी हमखास घेत होता. मात्र आता त्याला एकाही पिकाची हमी राहिलेली नाही.धरणामुळे परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती. परंतु ३२ वर्षाचा कालावधी लोटूनही व प्रकल्प पूर्ण झाला असला तरी उजव्या व डाव्या कालवाच्या पाणी वाहून नेणाऱ्या वितरीका पूर्ण झाल्या नाहीत. या कालव्यामुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळणे दुर्लक्षीत झाले आहे.गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासाठी चौरास भागातून २२ किमी लांबीचा डावा कालवा तयार करण्यात आला. शेतकरी दरवर्षी या कालव्यातून पाणी मिळेल म्हणून वाट पाहात आहेत. मात्र धरणाच्या वितरीकेची कामे सुरु होतात. पण पूर्ण ती पूर्ण केली जात नाही. दिवसेंदिवस कालव्याच्या रकमेत चौपटीने वाढ होत असल्याचे सांगण्यात येतेबळीराजाच्या चिंतेत वाढ, संसारासाठी उसनवारचौरास भागात असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाअभावी निसर्गाचा पाण्याची आवश्यकता आहे. असे असताना मृग नक्षत्र लोटूनही पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करुन शेती कसण्यासाठी उसनवार रक्कम घेत आहेत.
तलावाच्या जिल्ह्यात सिंचनाअभावी भातशेती झाली कोरडवाहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:51 AM
पवनी व लाखांदूर तालुक्यातील जमीन काळी व कसदार आहे. या भागातील शेतकरी विहिरीच्या पाण्यामुळे गत ४० वर्षापासून दुबार शेती करीत होते. परंतु गोसेखुर्द धरण बांधकामापासून भूमीगत प्रवाह बंद झाल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
ठळक मुद्दे८० टक्के विहिरी पडल्या कोरड्या। धानाचे पऱ्हे जगवणेही झाले कठीण