लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. दोन दिवसाच्या पावसाने ओले झालेले धान वाळविण्याचे प्रयत्न आता जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.भंडारा जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाते. जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धानावर अवलंबून आहे. या वर्षी हंगामात एका पाण्याअभावी अनेकांचा धान हातचा गेला. बहुतांश शेतकºयांनी ओलीत करून धान पिकविला. घरी आलेला धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. परंतु तेथे बारदान्याअभावी खरेदी मंद असल्याने उघड्यावरच धान ठेवावा लागला. रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसात शेतकºयांची हजारो पोती धान ओलेचिंब झाले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला आहे. आता ओला झालेला धान कुणी खरेदी करणार नाही म्हणून शेतकरी आधारभूत केंद्रावरून धान घरी नेण्याच्या तयारीत आहेत. आणण्यासाठी जेवढा खर्च लागला तेवढाच खर्च धान घरी नेण्यासाठी लागत आहे. हा धान उन्हात वाळवावा लागणार आहे. परंतु गत दहा दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कधी निवडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी पोते फोडून धान घराच्या आवारात झाकून ठेवला आहे.ओला झालेला धान पाखर होण्याची भीती आहे. बेचव झालेल्या धानाला बाजारात किंमत येत नाही. तसेच भरडाईनंतर त्याच्या रंगातही बदल जाणवतो. तसेच हा धान अधिक दिवस साठवूनही ठेवता येत नाही. एकंदरीत सर्वच बाजूनी शेतकºयांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. धानासोबतच बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणाने अळीचा प्रादूर्भाव वाढला आहे.अपुºया पावसाने धान उध्वस्त झाल्यावर शेतकºयांनी दुष्काळाची मागणी केली होती. परंतु शासनाने दुष्काळ घोषित केला नाही. भंडारा जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश नव्हता. सुरुवातीला एका पाण्याने आणि आता अवकाळी पावसाने शेतकरी पूरता उध्वस्त झाला आहे. घेतलेले कर्ज कसे फेडावे याचीच चिंता जिल्ह्यातील शेतकºयांना लागली आहे. पावसामुळे ओला झालेल्या धानाचे नुकसानभरपाई देण्याचीही मागणी पुढे येत आहे.आधारभूत केंद्रांवर बारदाण्याचा अभावआधारभूत केंद्रावर खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी पणन महासंघाच्या वतीने बारदाना पुरविला जातो. या बारदाना पुरविण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील केंद्रांवर बारदाना पुरविला जातो. परंतु धानाची मोठी आवक झाल्याने बारदाना अपुरा पडत आहे. काही ठिकाणी आलेला बारदाना अर्धा अधिक फाटका असल्याचे दिसून आले. अशा फाटक्या बारदान्यात धान भरावा कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच खरेदीची गती मंदावली. परिणामी शेतकºयांना आपला धान आधारभूत केंद्रात उघड्यावर ठेवावा लागला. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. बारदान्याचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
धान उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:53 AM
ऐन हंगामात एका पाण्याअभावी धानपीक हातचे गेले. त्यानंतर घरी आलेला धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी नेला. तर तेथे अवकाळी बरसलेल्या पावसाने उध्वस्त केले. निसर्गाच्या या लहरीपणाने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
ठळक मुद्देढगाळ वातावरण : ओले धान वाळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न