शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

धान गिरणी संचालक पायउतार

By admin | Published: September 25, 2015 12:23 AM

पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळचे संचालक लाल प्रसाद गोंडाणे यांनी धान गिरणीच्या रकमेची अफरातफर केल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

मासळ : पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळचे संचालक लाल प्रसाद गोंडाणे यांनी धान गिरणीच्या रकमेची अफरातफर केल्याने त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.लालप्रसाद शामदेव गोंडाणे हे दि पंचशील सहकारी धान गिरणी मर्या. मासळ र.नं. १०५ चे संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा पदाचा दुरूपयोग करून धानगिरणीच्या हजो रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार संस्थेचे सदस्य अर्जून तुकडू नान्हे यांनी सहायक निबंधक लाखांदूर यांच्याकडे ३ सप्टेंबर २०१४ ला केली होती.दि.१४ आॅगस्ट २०१४ च्या तपशिलानुसार संस्थेचे संचालक लालप्रसाद गोंडाणे यांचेकडे २०११-१२ या आर्थिक वर्षात ७४० रूपये अडव्हॅन्स थकित होते. त्यानंतर सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात त्यांनी एकूण ५६७५ रूपये अडव्हान्स घेतले. पुन्हा सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण २४ हजार ३२५ रूपये अ‍ॅडव्हान्स घेतले होते. अशाप्रकारे ३० हजार ७१२ रूपये एकंदरीत अ‍ॅडव्हान्स रक्कम गोंडाणे यांच्याकडे होती. यापैकी २० आॅगस्ट २०१२ ला २२५ रूपये आणि १२ एप्रिल २०१३ ला १० हजार ०६० रूपये परत केले. त्यामुळे १४ आॅगस्ट २०१४ रोजी त्यांच्यावर २० हजार ४२७ रक्कम थकित असल्याचे आढळले. कायद्यानुसार संचालकाला एका महिन्याच्या कालावधीत अ‍ॅडव्हान्स घेतलेल्या रकमेचा हिशेब संस्थेला देणे अनिवार्य असताना सदर संचालकाने मात्र वरील रकमेचा उपयोग स्वत:च्या हितासाठी सुमारे अडीच वर्षे केला. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याने २८ आॅगस्ट २०१४ ला संचालक गोंडाणे यांनी थकीत रकमेचा भरणा केला असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. परंतु तक्रारकर्त्यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करून लालप्रसाद गोंडाणे यांना संचालक मंडळातून काढण्याचा सहायक निबंधकांनी निर्णय दिला. (वार्ताहर)