शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 1:08 AM

भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली.

ठळक मुद्देपावसाची दडी : एक लाख ६१ हजार हेक्टरपैकी ३६ हजार हेक्टरवरच रोवणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरवरील भात रोवणी रखडली आहे. एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ३९५ हेक्टरवर रोवणी झाली आहे. एकुण क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी आटोपली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी रोवणी करीत आहेत.भंडारा जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. भात पिकावरच येथील शेतकऱ्यांच्या हंगामाचे गणित अवलंबून असते. सुरुवातीला हवामान खात्याने मुबलक पावसाला अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी मशागत करून नर्सरीत पऱ्हे टाकले. जिल्ह्यात १३ हजार ९६ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले होते. दमदार पाऊस पडल्यानंतर पऱ्ह्यांची रोवणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली. परंतु गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पाऊस कोसळत आहे. काही भागात तर पावसाचे दर्शनही झाले नाही. परिणामी रोवणी रखडली आहे. भंडारा तालुक्यात २१३०६ हेक्टर रोवणीचे क्षेत्र असून आतापर्यंत केवळ १९५७ हेक्टरवर रोवणी झाली आहे. मोहाडी तालुक्यातील २७०९६ हेक्टर पैकी ५७३० हेक्टर, तुमसर तालुक्यात २७ हजार ५६९ हेक्टरपैकी ५३२५ हेक्टर, पवनी १८ हजार ६९२ हेक्टर पैकी २९६९ हेक्टर, साकोली १८ हजार ५०१ हेक्टर पैकी ८७४० हेक्टर, लाखनी २२ हजार ६३१ हेक्टर पैकी ६७१२ हेक्टर आणि लाखांदूर तालुक्यातील २५ हजार ७७६ हेक्टर क्षेत्रापैकी ५७९८ हेक्टरवर रोवणी आटोपली आहे. नियोजित क्षेत्राच्या केवळ २४ टक्केच रोवणी झाली आहे.पावसाने दडी मारल्याने रोवणी रखडली आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी १३३० मिमी असून आतापर्यंत ४४६.२ मिमी पाऊस कोसळला आहे. त्यातही अनेक भागात पावसाने दर्शनच दिले नाही. जोरदार पाऊस झाल्याशिवाय रोवणी करणे शक्य नाही. ओलीताची सोय असलेले शेतकरी रोवणी करीत असले तरी त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. रोवणी लांबल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक सर्वसाधारण धानाची लागवड केली जाते. कमी कालावधीत निघणारा हा धान असून रोवणीस उशीर झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो.जिल्ह्यात सरासरी ४४६ मिमी पावसाची नोंदभंडारा जिल्ह्यात १ जून ते २१ जुलै या कालावधीत ४४६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुका ५५९ मिमी, मोहाडी ४०७.६ मिमी, तुमसर ३०४.० मिमी, पवनी ४५०.७ मिमी, साकोली ५१२.८ मिमी, लाखांदूर ३३७.२ मिमी आणि लाखनी ५५१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष पडणाºया पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९० टक्के असला तरी रोवणीयोग्य मात्र निश्चितच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रोवणी रखडल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस