शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

जिल्ह्यात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 9:28 PM

अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २३३ केंद्रांना मंजुरी दिली असली तरी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बहुतांश सर्वच केंद्रांवरील मान्यता रखडली होती. आता १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने या केंद्रांना खरेदीची मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे.भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेचा शुभारंभ झाला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यातच अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. त्यातही सर्वाधिक केंद्र पवनी तालुक्यातील आहेत.भंडारा तालुक्यात १७ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ५६ शेतकऱ्यांनी २३४७ क्विंटल धानाची विक्री केली आहे. लाखनी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी ५६ क्विंटल तर लाखांदूर तालुक्यात २६ शेतकऱ्यांनी ८८७ क्विंटल आणि पवनी तालुक्यातील १५५ शेतकऱ्यांनी ६३०३ क्विंटल धान पणन महासंघाला विकला आहे. विशेष म्हणजे मोहाडी, तुमसर आणि साकोली तालुक्यात अद्याप एक क्विंटलही धानाची खरेदी झाली नाही. अद्याप खरेदी केंद्र सुरूच झाले नसल्याने शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचण येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांची अद्यापही ऑनलाईन नोंदणी झाली नाही. ३० नोव्हेंबरनंतर धान खरेदीला वेग येईल, असे पणन महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

२३९ शेतकऱ्यांनी विकला धान

- जिल्ह्यातील प्रत्यक्ष सुरू झालेल्या १५ केंद्रांवर आतापर्यंत केवळ २३९ शेतकऱ्यांनी धान विकला आहे. नऊ हजार ५९४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून आतापर्यंत ८१ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर १५० शेतकऱ्यांनी नोंदणीचा ॲप डाऊनलोड केला आहे. दोन लाख २३ हजार शेतकरी नोंदणीकृत असून अद्यापही सुमारे दीड लाख शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. दोन आठवड्यांत नोंदणी करण्याचे दिव्य शेतकऱ्यांना पार पाडावे लागणार आहे.

शेतकरी धान खरेदी केंद्रांच्या शोधात- पणन महासंघाने धान खरेदीसाठी १२२ केंद्रांना परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात केवळ १५ केंद्र सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विकताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी आपल्या परिसरातील धान खरेदी केंद्र सुरू झाले काय, याचा शोध घेत आहे. केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांना धान विकावा लागत आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड