अख्ख्या महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क वापरणे, सनिटायझर करणे, शक्यतो घराच्या बाहेर न पडणे अशा सूचना शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेले आहे. त्यामुळे जनसामान्यांनी वेळीच सावध होत कोरोना संसर्गजन्य आजार टाळण्याकरिता शासनाने पुरविलेल्या सूचनांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार मनोज सिडाम व माधव वनवे यांनी केले आहे.
चौकट
कडकडीत लाॅकडाऊन नको
कोरोना संसर्गजन्य आजाराने जनसामान्यांचा इतरांनाही संकटात टाकलेले असले तरी गोरगरिबांचे बेहाल लाॅकडाऊनमुळे शक्य आहे. व्यापारी वर्गांना वेळेचे बंधन देत सुनियोजित वेळापत्रक तयार करून द्यावे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पोटाची काळजी आहे. शासनाने एकतर्फी विचार करू नये. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची अवस्था बिकट आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खूप नाजूक आहे. अशा कठीण प्रसंगी प्रसंगावधान साधून वेळेला अधिक ताणण्यापेक्षा व्यापारी वर्गाच्या सहयोगाने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा. असे बाजारपेठेतील व्यापारी वर्गातून मागणी उमटत आहे. यात जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेत तहसील कार्यालयामार्फत व्यापारी वर्गासाठी विशिष्ट नियमावली तयार करून पुरवावे.