पळसगाव सोनका गावातून रात्री रेतीचा उपसा डम्पिंग केला जात आहे. रेती जास्त किमतीने गोंदिया जिल्ह्यात पाठविली जात आहे. पवारटोली, महालगाव, परसोडी, गोंडउमरी, उमरी व भोजू घाट या सर्वच घाटांतून रात्री रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळेच शासकीय यंत्रणा कुचकामी झालेली आहे. गोंडउमरी येथील तलाठी रात्री जाण्यास टाळत आहेत. पळसगाव घाटावर पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे याकडे दुर्लक्ष आहे.
गावातून ट्रॅक्टर, टिप्पर धावत असल्याने गावकऱ्यांची झोप उडत आहे. गत अनेक दिवसांपासून ही रेती नैनपूर, पापडा, टोला, नवेगावबांध मार्गाला जात आहे.
गोंदिया जिल्ह्याचे अधिकारी कारवाई करीत असतात. तहसीलदार चौकशी करीत नाहीत आणि त्यामुळे प्रशासनाच्या तिजोरीला कोट्यवधींचा चुना लागलेला आहे. मात्र, कुठलीही कारवाई केली जात नाही. गोंदिया जिल्ह्यामध्ये बैलगाडीवर कारवाई केली जात आहे.