न्यायाधीश व अधिवक्ता हे कायद्याचे संरक्षणकर्ता आहेत. सर्व पॅनल अधिवक्त्यांनी मानधनाकडे लक्ष न देता सेवाभावी उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणामार्फत नियुक्त प्रकरण चालवावे. सर्व पॅनल अधिवक्त्यांनी वकिली क्षेत्रात निष्णांत होण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा तसेच न्यायालयात पुरावा सादर करतांना कोणत्या बाबींकडे भर द्यायला पाहिजे याबाबत अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
न्यायालयात चालणारी फौजदारी खटल्यांची प्रक्रिया, फौजदारी खटला चालवितांना अधिवक्त्यांनी काय करावे व काय करु नये तसेच भारतीय दंड सहितेतील महत्वाच्या तरतूदीबाबत बीड जिल्हा अधिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड. मंगेश पोकळे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पॅनल अधिवक्ता सोनाली अवचट यांनी केले तर उपस्थितांचे आभार सह दिवाणी न्यायाधीश आर. पी. थोरे यांनी मानले. सदर कार्यक्रमास आभासी पध्दतीने भंडारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, भंडारा जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर. के. सक्सेना व इतर सदस्य तसेच विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल अधिवक्ता उपस्थित होते.