लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : या परिसरातील धानपिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याने आक्रमण केले असून अनेक शेतकºयांची अख्खी धानशेती फस्त केली आहे. या तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी विविध कंपन्यांच्या औषधी उपलब्ध आहेत. मात्र त्या सर्व औषधी तुडतुड्याचा प्रादुर्भाव रोखण्यात कुचकामी ठरल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशा संकटसमयी कृषी विभाग सुस्त असल्याचे चित्र आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या व मध्यम धानाची लागवड करण्यात आली होती. संकटे ही धानउत्पादक शेतकºयांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातही सुरूवातीला पावसाने हजेरी लावून नंतर दडी मारली. शेतकºयांनी जीवाचा आटापीटा करून् कसेबसे रोवणे आटोपले. त्यानंतर खोडकिड्याचे आक्रमण, परतीच्या वादळी पावसाचा फटका आदी विविध संकटांवर मात करून आता आठ-१० दिवसात परिपक्व झालेले धान कापून मळणी करण्याच्या बेतात शेतकरीवर्ग होता.अचानक तुडतुड्याने धानपिकांवर आक्रमण करून शेतकºयांची झोप उडविली. या रोगांची मारक क्षमता एवढी भयंकर आहे की थोड्याशा जागेत असलेला प्रादुर्भाव एक दोन दिवसांतच संपूर्ण शेत उद्वस्त करतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या धानाची तणसही जनावरे खात नाहीत. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी विविध कंपन्यांची अनेक महागडी औषधे उपलब्ध आहेत. मात्र त्यासर्व औषधी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात कुचकामी ठरल्याने शेतकºयांवर कपाळावर हात मारण्याची पाळी आली आहे.शेवटी अखेरचा उपाय म्हणून बहुतांश शेतकºयांनी या रोगाचा प्रादुर्भाव आढळताच पीक पूर्णपणे परिपक्व होण्याची वाट न पाहता अपरिपक्व धान कापण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासर्व शेतकºयांची धानकापणी एकाचवेळी आल्याने मजुरांची चणचण जाणवत असून जास दराने मजुरी देऊन धानकापणी करावी लागत आहे. यातही शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.पिकविम्याचा लाभ मिळणार कायनैसर्गीक आपत्तीत शेतकºयांना आधार देण्यासाठी धानपिकांचा विमा काढण्यात आला. यासाठी कर्जदार शेतकºयांकडून हेक्टरी ७८० रूपयांचा विमाहप्ता कर्जाच्या रकमेतून सक्तीने वसुल करण्यात आला. त्यामुळे सध्याच्या या नैसर्गीक आपत्तीत शेतकºयांना पिकविम्याचा लाभ मिळावा, अशी परिसरातील शेतकºयांची मागणी आहे. पिकविमा मिळविण्याकरिता असलेल्या जाचक अटी शेतकºयांना अडसर ठरण्याची शक्यता आहे.प्रभावित क्षेत्राचे पंचनामे करा -जिल्हाधिकारीभंडारा : गेल्या काही दिवसात जिल्ह्यामध्ये भात पिकावर मावा व तुडतुडयांचा मोठया प्रमाणावर पादुर्भाव झाल्याचे दिसून आले असून काही तालुक्यांमध्ये या प्रादुभार्वामुळे पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा याबाबतीत आपल्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय अधिकाºयांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याबाबत आपल्यास्तरावरुन सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिले.सदर पंचनामे करतांना आपल्या जिल्ह्यातील नियुक्त केलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे शिल्लक राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व शेतकºयांना याबाबत मदत देण्याकरीता आपल्यास्तरावरुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्याच प्रमाणे नुकसानीची माहिती देण्याकरीता तालुकास्तरावर हेल्प लाईन निर्माण करुन त्यावर मिळालेल्या माहितीच्या आधारे दैनंदिन पंचनाम्यांचे नियोजन करावे व केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
मावा-तुडतुडा किडीने केले धानपीक फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:52 PM
या परिसरातील धानपिकांवर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याने आक्रमण केले असून अनेक शेतकºयांची अख्खी धानशेती फस्त केली आहे.
ठळक मुद्देकृषी विभाग सुस्त : शेतकरी हतबल, सर्व औषधी ठरल्या कुचकामी