माेहाडी : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याची लगबग सुरु झाली आहे. पालक मुलांना शाळेत पाठविण्यास उत्सुक असले तरी त्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकत आहे.
नववी ते बारावीचे वर्ग सुरु हाेऊन आता सात आठवडे झाले आहेत. सुरळीतपणे शाळा सुरु आहे. भंडारा जिल्ह्यात कुठेही खंड पडला नाही. तसेच काेणत्या विद्यार्थ्याला काेराेनाची बाधाही झाली नाही. शाळा सर्व बाजूने काळजी घेत आहे. आता याच धर्तीवर उच्च प्राथमिक शाळा सुरु हाेत आहे. पाचवी ते आठवी या वर्गातील मुले लहान असल्याने पालक साशंक दिसत आहेत. ग्रामीण भागातील पालक आता कंटाळले असून गुरुजी शाळा कधी सुरु हाेतील असा प्रश्न विचारत आहे. राज्य शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी १८ जानेवारी राेजी पत्र काढले. वर्ष वाया जाऊ नये असे पालकांना वाटत आहे. त्यामुळे उत्सुकता असली तरी दडपनही पालकांवर दिसत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७९५ शाळा आणि खासगी व्यवस्थापनाच्या ४८९ शाळा आहेत. सर्वाधिक शाळा जिल्हा परिषदेत असल्याने काेराेना सुरक्षित उपाययाेजना प्रशासनाला करावे लागणार आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पाचवी १६९४७
सहावी १७८६१
सातवी १७९३९
आठवी १८४००
जिल्ह्यातील शाळांची संख्या १२८४
जिल्हृयातील शिक्षक २१८७
बाॅक्स
नववी ते बारावीची उपस्थिती
जिल्ह्यात २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. ६६ हजार ३०६ विद्यार्थ्यांपैकी २९ हजार ७२८ विद्यार्थी एक दिवसाआड उपस्थित राहत आहेत. २४ हजार ८२८६ पालकांनी अद्यापही संमती दिली नाही.
पालकांना काय वाटते
शाळा सुरु झाल्या पाहिजेत. ऑनलाईन शिक्षण बराेबर हाेत नाही. मुले घरी असल्याने आम्हीही कंटाळलाे आहाेत. मुलांना काेराेना लस उपलब्ध करुन द्यावी.
- सुरेखा तिजारे, कान्हळगाव
मुले घरी अभ्यास करीत नाही. प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या पाहिजे. मात्र शाळेत मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. काेराेनाने मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे.
- प्रभाकर वैद्य, बाेथली
शासन परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्याचे निर्देश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शाळा प्रमुखांनी काेविड संदर्भातील सर्व सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.
- मनाेहर बारस्कर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)