शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:35 PM

प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

ठळक मुद्देजबाबदारी ढकलण्याची कवायत : नागरिकांचीही अनास्था, पुढाकार कुणी घेईना, अड्याळ येथील प्रकार

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.दुकाने, बँक, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवासी निवारा, मुख्य व्यापारी लाईन किंवा विविध महत्वाच्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसीन येते. अड्याळ येथेही अशीच स्थिती आहे. दुचाकीसह चारचाकी वाहन धारकाला नेहमी एकच प्रश्न पडतो तो म्हणजे वाहन ठेवायचे तरी कुठे? मग मिळेल त्या ठिकाणी वाहन उभे ठेवले जाते? परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होतो. यात ग्रामस्थांना, पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना याचा रोजच त्रास सहन करावा लागतो. याची कल्पना सुद्धा संबंधित प्रशासन तसेच विभागाला आहे का, असा सवाल मात्र आज ग्रामस्थ ठिकठिकाणी करताना दिसत आहे.अड्याळ गावात पोलीस ठाणे आहे तसेच तालुक्यातील सर्वात मोठी व उप तालुक्याचा नावाचा दर्जा प्राप्त असलेली १९ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यालय आहे. या इमारतीला लागूनच प्रवासी निवारा परिसर आहे. यामध्ये नेहमीकरिता एक वाहतूक नियंत्रक राहिल म्हणून मागील काळात ठरले होते, परंतु शोकांतिका अशी की काही दिवस सुरळीत चालले, त्यात सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आली व त्यानंतर मात्र याविषयी कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान देणे टाळले. आमि समस्या वाढतच गेली.गुजरी चौकामधील बँकमध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने खातेधारक येतात. यात त्यांना गर्दीचा तसेच शौचालय व वाहन पार्किंगच्या समस्येचा सामना गेली अनेक वर्षापासून होत असतानाही मात्र याकडे लोकप्रतिनिधी नेहमीच दुर्लक्ष करतात.गावातील प्रवासी निवारा परिसरातील अनधिकृत पार्किंग होण्यामागे जबाबदार कोण, असा प्रश्न मात्र आज ग्रामस्थांना पडला आहे. एखादी अती महत्वाच्या, तात्काळ सेवेचा लाभ मिळणेकरिता गावातील मुख्य मार्गावरून जायचे झाल्यास अनेक ग्रामस्थांना त्याचा भयंकर त्रास होतो तशीच काहीशी स्थिती बसप्रवासी निवारा परिसरातील नेहमीच पाहायला मिळते. येथील दुकानदारांच्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयातही तीच स्थिती आहे.वाहनधारक तसेच चालकांनी वाहन ‘पार्क’ तरी कुठे करायचे. यावर ग्रामपंचायत की पोलीस प्रशासन एकमेंकावर जबाबदारीचे खापर फोडीत असतात. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आहे. सरपंच जयश्री कुंभलकर यांच्या मते यासाठी येथील व्यवसायीकांनी व वाहतूक नियंत्रक, पोलीस कर्मचारी यांनी गावहितासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.