राजेश बांते यांचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलैपर्यत असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश बांते यांनी केले आहेनिसर्गाचा कधीच भरोसा देता येत नाही, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास कुणाच्या मदतीची किंवा कुणापुढे हात पसरण्याची गरज नाही. त्यासाठी प्रत्येक हंगामात आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाचा विमा मात्र नक्की काढला पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाल्यास ,सहभाग रक्कम सुद्धा अत्यल्प आहे. यंदा भंडारा जिल्ह्यात बहुतेक भागात ४० टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही भागात पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागेल असे वाटत असतानाच पावसाने कृपा केली. मात्र आता तरी ३१ जुलै पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढून घ्यावा. त्यासाठी आपल्या गावाच्या जवळ असलेल्या बँकेत किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क करून आवश्यक कागदपत्रे जमा करून, रक्कम भरून या योजनेत सहभागी व्हावे. अतिवृष्टी, पूरस्थिती, गारपीट, दुष्काळ, वादळ अशा कोणत्याही आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास २४ तासाच्या आत ते शासनाकडे किंवा बँकेत लेखी कळवावे. सोबत काढलेल्या विम्याची झेरॉक्स जोडावी. पंचनामा होताना उपस्थित राहावे, असे आवहन बांते यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:23 AM