लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा व पवनी आगारांतर्गत परिवहन महामंडळाने नियमित बससेवा सुरू केली असली तरी वेळेवर पवनी-भंडारा या मार्गावरील प्रवाशांना एसटी बससेवा उपलब्ध होत नसल्याने डोकेदुखी ठरल्याचा आरोप होत आहे. परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा ठपका अनेक प्रवाशांनी ठेवला आहे.पवनी आगाराअंतर्गत भंडारा येथे जाणाऱ्या अनेक बसेस असल्याचा कांगावा केल्या जात असल्याची माहिती आहे. आंतर जिल्ह्यातील प्रवाशांचे केंद्रस्थान व ऐतिहासिक वारसा असलेल्या पवनी येथून बहुसंख्य प्रवासी सातत्याने भंडारा व गोंदियाकडे प्रवास करीत असतात. पवनी एसटी बस आगार असल्याने या स्थानकावरून नियमित बससेवा सुरू असते, अशी हमखास खात्री प्रवाशात असली तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. दोन-दोन तास विद्यार्थी, प्रवाशांना ताटकळत बसेसच्या प्रतीक्षेत वाट पाहात उभे राहावे लागते. जिल्ह्याचे स्थान म्हणून भंडाराकडे जात असताना या आगारांतर्गत पर्याप्त बससेवा उपलब्ध नसल्याचा आरोपही अनेक प्रवाशांनी केला. तब्बल ४२ किलोमीटर अंतराच्या पवनी ते भंडारा या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असताना बससेवा देखील प्रवाशांच्या कामी येत नसल्याने सारे प्रवासी हताश झाल्याचे दिसून येत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांना ऐनवेळी बससेवा उपलब्ध होत नसल्याने परिवहन महामंडळाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.दरम्यान, आंतर जिल्ह्यातील प्रवाशांना पर्यटन स्थळ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, गोसेखुर्द धरण, उमरेड-पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प, पवनीतील धार्मिक मंदिरे, सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप, वैजेश्वर मोक्षधाम आदींना भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने या मार्गावर बससेवेअंतर्गत येता जाताना दिसत असल्याची देखील माहिती आहे. मात्र, या पर्यटकांसह प्रवाशांना वेळेत बससेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रवाशांची कुचंबणा होत असताना परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप जनतेतर्फे केला जात आहे.भंडारा-पवनी या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होत असताना प्रवाशांसाठी रस्ता बांधकामाअभावी प्रवास खातर झाल्याची चर्चा आहे.मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया बहुतेक प्रवाशांना नियमित वेळेत बससेवा उपलब्ध होत नसल्याने अनेक शासकीय, प्रशासकीय कामे खोळंबली जात असल्याचे देखील आरोपात्मक प्रवाशी जनतेनी बोलून दाखविले.पवनी आगाराअंतर्गत पवनी-भंडारा मार्गावर जादा बससेवा सुरू केल्यास विद्यार्थी जनतेसह शासकीय, प्रशासकीय कामे उरकण्यासाठी जाणाºया प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी जनतेत केली जात असून पवनी-भंडारा मार्गावर जादा बससेवा सुरू करावी तसेच एकामागोमाग लागणाºया तीन-चार एसटी बस गाड्या आवश्यक अंतर ठेवून सोडाव्यात, अशीही मागणी प्रवाशी जनतेनी केली आहे.
पवनी-भंडारा मार्गावर प्रवाशांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:00 AM
दरम्यान, आंतर जिल्ह्यातील प्रवाशांना पर्यटन स्थळ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, गोसेखुर्द धरण, उमरेड-पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प, पवनीतील धार्मिक मंदिरे, सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप, वैजेश्वर मोक्षधाम आदींना भेटी देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सातत्याने या मार्गावर बससेवेअंतर्गत येता जाताना दिसत असल्याची देखील माहिती आहे.
ठळक मुद्देसुरळीत बसफेरीची मागणी: राज्य परिवहन महामंडळाचा अनागोंदी कारभार