सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तुमसर - भंडारा राज्यमार्गावर अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक मद्यपान करुन वाहन चालवित असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका झाला आहे. हे सरळ अपघाताला निमंत्रण आहे. मात्र या प्रवाशी वाहतुकीच्या चालकांची मद्यपान चाचणी केली जात नाही ही शोकांतिका आहे.तुमसर ते भंडारा मार्गावर अनेक वर्षापासून अवैध प्रवासी वाहतूक सुरु आहे. या मार्गावर एकही काळी पिवळी टॅक्सी नाही तरी जवळपास ३० ते ३५ सवारी गाड्या या रस्त्यावर धावताना दिसतात.यापैकी काही प्रवासी गाड्यांचे चालक दररोज दिवसाही मद्यपान करुन असल्याचे आढळले आहे. प्रवासी मिळविण्यासाठी असे चालक मग बेधुंद गतीने वाहने चालवुन पुढचा बसस्टॉप गाठतात. अनेक वेळा दोन प्रवासी वाहनात शर्यत लागली आहे की काय असेच वाटते मात्र यात अनेक प्रवाशांचा जीव टांगणलीला असतो. मात्र, याकडे पोलीस व आरटीओ विभागाचे पुर्णत: दुर्लक्ष झालेले दितसे.विशेष बाब म्हणजे यातील काही चालकाजवळ वाहन परवाना सुध्दा नाही तर काही प्रवासी गाड्या मालकांनी विमा सुध्दा काढलेला नाही, असे चालक स्वस्त मोबदल्यात मिळत असल्याने गाड्यांचे मालक याचा लाभ उचलत असल्याचे दिसून येते.काही सुज्ञ प्रवाशांनी या प्रकाराची तक्रार पोलीस विभागाला करुन सुध्दा कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.पोलिसांनी जर मद्यपान तपासणीची मोहीम चालविली तर अर्ध्या अधिक चालकांवर दंड होण्याची शक्यता आहे.विशेषत: आरटीओ विभागाचे अधिकारी किंवा वाहतूक पोलीस वाहनांचे कागदपत्रे तपासतांना अनेकवेळा दंड सुध्दा आकारतात पण प्रवासी वाहनांना तसेच सोडले जात असल्याने नियमांचे राजरोसपणे उल्लंघन केले जात आहे.रॉकेलवर धावतात प्रवासी वाहनेशासनाने सामान्य नागरिकांच्या वाट्यातील रॉकेलची मोठी कपात केली आहे. मात्र अवैध प्रवासी वाहतुक करणा-या गाड्यांच्या मालकाला ते सहजतेने उपलब्ध होत आहे. अनेक प्रवासी गाड्या रॉकेलवर धावत आहेत. त्यामुळे प्रदुषणात मोठी वाढ होत आहे.श्रॉकेल डिलर असलेल्या एक व्यक्तीचे अवैध प्रवासी वाहनात अनेक वर्षापासुन रॉकेलवरच चालत असून त्याने एकदाही डिझेल भरलेला नाही असे समजते. आठवड्यातुन एकदा कोणत्याही दिवशी याची तपासणी केल्यास सत्य बाहेर येण्यास वेळ लागणार नाही. याकडे ही वाहतुक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.डोळे तपासणीही नाहीप्रवासी वाहनांच्या चालकांची वर्षातुन एकदातरी डोळे तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच वारंवार मधामधात या वाहन चालकांनी मद्यसेवन तर केले नाही याची सुध्दा तपासणी केली तर मद्य सेवन करुन वाहन चालविण्यावर आळा बसु शकतो. ज्यामुळे अपघाताच्या प्रमाणात आपोआपच ब्रेक लागेल, यात दुमत नाही.
मद्यपान करुन होतेय प्रवासी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 9:38 PM
तुमसर - भंडारा राज्यमार्गावर अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक मद्यपान करुन वाहन चालवित असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका झाला आहे. हे सरळ अपघाताला निमंत्रण आहे. मात्र या प्रवाशी वाहतुकीच्या चालकांची मद्यपान चाचणी केली जात नाही ही शोकांतिका आहे.
ठळक मुद्देजीवाशी खेळ : तपासणी मोहीम आवश्यक, मोहाडी तालुक्यात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट