रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी व विदयार्थानी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. यावेळी एकूण २४ यूनिट रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट वैभव तोष्णिवाल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. वीणा महाजन, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख, प्रा. जितेंद्र किरसान, क्रीडा विभागाचे डॉ. भीमराव पवार, डॉ. रोमि बीष्ट, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अपर्णा यादव, प्रा. जयप्रकाश मातलाम प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय रुग्णालय भंडारा येथील डॉ. मीरा सोनवाने डॉ. सुरेखा भिवगडे,समुपदेशक सुरेश ठाकरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजू नागदेवे, दिनेश रामटेके, प्रेरणा थुल यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विदयार्थांनी सहकार्य केले. २६ लोक ०३ के
पटेल महाविद्यालयाम रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:26 AM