ऑनलाईन लोकमतपवनी : विश्वात सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्याकरिता भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्याची गरज आहे. बुद्धाचा शांतीचा मार्गच विश्वाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन पञ्ञा मेत्ता संघ जपानचे अध्यक्ष खोशोतानी यांनी केले.महासमाधीभूमी महाविहाराचा ११ वा, पञ्ञा मेत्ता बालसदनाचा २३ वा, वाचनालयाच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त महासमाधीभूमी महास्तुप रूयाळ (सिंदपुरी) येथे आयोजित ३१ व्या धम्म महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी धम्मपीठावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पञ्ञा मेत्ता संघाचे अध्यक्ष धम्मदूत भदंत संघरत्न मानके होते.याप्रसंगी अ.भा. भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथवीर, तेंदाई संघ इचिगुवो तेरासू, जापानचे अध्यक्ष भदंत शोताई योकोयामा, म्यामनारचे भदंत डॉ. सयाडो उत्तमा, तिबेट गोठनगावचे भदंत लोबझान तेंबा, पञ्ञा मेत्ता संघ जपानचे कार्याध्यक्ष भदंत शोझे आराही, जपानचे भदंत खोदो कोंदो, योशितेरू सामेजीया, होजिरी विहार सारनाथच्या भिक्खुनी म्योजिच्छू नागाकुची, पश्चिम बंगालचे भदंत शुभरत्न, बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहारचे अध्यक्ष सत्यशील, बौद्ध चैतीय प्रकल्प राजेगावचे अध्यक्ष भदंत धम्मदीप, विदर्भ भिक्कु संघाचे अध्यक्ष भदंत प्रियदर्शी, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक भदंत नागदीपांकर, प्रज्ञागिरी डोंगरगडचे भदंत धम्मतप, भदंत धम्मशिखर, नागपूरचे भदंत महापंत, भदंत मेत्तानंद, भदंत शिलवंश, भदंत संघकिर्ती, अरूणाचल प्रदेशचे भदंत वन्नास्वामी, सिंदपुरीच्या सरपंच भाग्यश्री येलगुले, रूयाडच्या सरपंच माधुरी पचारे उपस्थित होते.यावेळी संघरत्न मानके म्हणाले, या महास्तुपाची ही वास्तू भारतात सर्वात मोठी असून हा महास्तुप भारत जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरला आहे. या स्तुपामुळे पर्यटनाला चालना मिळून विकासाचे नवीन दारे उघडणार आहेत. संघाच्या कार्यामुळे सुरूवातीच्या काळापासून जनतेचा सामाजिक, धार्मिक, आर्थिक विकास कसा करावा यावर काम सुरू आहे.मुख्य समारंभात भदंत शोताई योकोयामा म्हणाले, भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचे अनुसरन करण्याची गरज आहे. भदंत सदानंद महास्थवीर म्हणाले, माझे जन्मस्थळ पवनी तालुक्यात असल्यामुळे मला आपुलकी आहे. पञ्ञा मेत्ता संघाचे कार्य समाजाला पथदर्शक ठरेल.याप्रसंगी पञ्ञा पिठक पुरस्कार भिख्कुनी संघमित्रा व भदंत सत्यशील यांना व मेत्तापिठक पुरस्कार उमेश राठोड व उपासक डी.एम. बेलेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक धम्मानंद मेश्राम, संचालन अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी तर आभारप्रदर्शन अॅड. गौतम उके यांनी केले. कार्यक्रमासाठी मनोहर मेश्राम ब्रम्ही, शिलरत्न कवाडे, अॅड. जयराज नाईक, भदंत धम्मतप, जयसर, करुणा टेंभुर्णे, गजेंद्र गजभिये, अॅड. गौतम उके, प्रफुल्ल वाघमारे, श्रीकांत शहारे व समता सैनिक दलाने सहकार्य केले.
बुद्धाचा शांतीचा मार्गच विश्वाला नवी दिशा देईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:25 AM
विश्वात सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. अराजकता निर्माण झाली आहे. त्यामुळे विश्वात शांती निर्माण करण्याकरिता भगवान गौतम बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने वाटचाल करण्याची गरज आहे.
ठळक मुद्देभदंत खोशोतानी : महासमाधीभूमी महाविहाराचा ११ वा वर्धापन दिन