संडे हटके बातमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.माहितीनुसार ३ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास बोदरा येथील रहिवासी असलेल्या भीमराव तिरपुडे यांनी तक्रारदार जागेश्वर वैद्य यांना भ्रमणध्वनीहून माहिती दिली की, वैद्य यांची साळी मनिषा व त्यांचे पती प्रफुल्ल यांच्यात भांडण झाले. यात मनिषा तागडे ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे असे फोनवरून सांगितले.माहितीवरून जागेश्वर वैद्य हे बोदरा येथे तागडे यांच्या घरी आली. यावेळी मनिषा ही जमिनीवर पडली होती. घरातील सामानही अस्तव्यस्त स्थितीत असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी जागेश्वरने प्रफुलला विचारले असता तो म्हणाला, मनिषासोबत भांडण झाल्याने तिचा पाळण्यातील दोरीने गळा आवळून ठार मारल्याचे सांगितले. याबाबत वैद्य यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी प्रफुल्ल तागडे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.चार हजार रूपयांच्या दंडाचीही शिक्षासहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा यांनी प्रफुल्लला अटक केली. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले. यावेळी साक्ष व पुराव्याच्या आधारावर प्रफुल्ल तागडे हा आरोपी असल्याचे सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी त्याला आजन्म कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड.प्रमोद भुजाडे यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विनोद बघेले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:54 PM
साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला.
ठळक मुद्देबोदरा येथील प्रकरण । जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल