जखमी सापाला जीवदान : गुणवंत भडके यांनी केली सर्पमित्रांच्या मदतीने शस्त्रक्रियाभंडारा : सानगडी येथील डॉ. संजीव नैतामे यांचे घरी रात्री ११.३० चे सुमारास पट्टेरी मण्यार नावाचा साप तोंडावर जखम झाल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्या सापावर सर्पमित्रांच्या मदतीने पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी शस्त्रक्रिया करून सापाला जीवनदान दिले.जखमी अवस्थेतील पट्टेरी मण्यार सापाची माहिती अड्याळ येथील सर्पमित्र आरीफ नैतामे व संदीप शेंडे यांना मिळाली. त्यांनी या सापाला पकडून वनविभाग अड्याळ येथे आणले.वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाठक व वनसंरक्षक शेख यांनी सर्पमित्र यांचे मदतीने सापाला मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे आणले. त्याचा जबडा फाटलेला होता व तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता.पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके व कर्मचाऱ्यांनी सदर मण्यार जातीच्या या अत्यंत विषारी सापाच्या तोंडावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याने आपली पूर्ण जिभ बाहेर काढल्यावर तो सामान्य झाल्याचे दिसून आले. त्याची जखम पूर्ण दुरूस्त झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)दुर्मिळ सापाची माहितीसाप सहसा आढळून येत नाही. हा अत्यंत विषारी साप असून त्याला स्थानिक भाषेत आग्या मण्यार या नावाने व इंग्रजी ‘बॅन्डेड फ्रेट’ या नावाने संबोधतात. याची लांबी अंदाजे ४ ते ५ फूट होती. शरीरावर रूंद काळे आणि पिवळे आडवे पट्टे आहेत. शरीर त्रिकोणी आहे. बोथ गोलाकार शेपटी आहे.सहसा हा साप गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात म्हणजे दमट जंगलामध्ये आढळतो. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे कधीकधी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात क्वचित प्रसंगी हा साप आढळून येतो. भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात सहसा आढळून येत नाही. हा निशाचर आहे. रात्रीच जास्तीत जास्त अन्नाच्या शोधात फिरतो. - डॉ. गुणवंत भडकेपशुधन विकास अधिकारी, मानेगाव.
‘पट्टेरी मण्यार’ विषारी सापावर शस्त्रक्रिया
By admin | Published: August 14, 2016 12:16 AM