शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पवनीच्या पर्यटनाला हवी विकासाची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 6:00 AM

१५० हून अधिक वर्ष लोटले १०० वर्षापूर्वी गावात नांदत असलेली समृध्दी नाहीसी झाली. पवनीचा विकास खुंटला. रोजगाराच्या संधी शिल्लक नाहीत. बेरोजगारी वाढली. आर्थिक उलाढाल कमी झाली, व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटला. परिणामी गावातील काही लोक श्रीमंत झाले असले तरी सामान्य जनता गरीबीच आहे.

ठळक मुद्देनिधी वापरावर हवा अंकुश : बेरोजगारी वाढली, आर्थिक उलाढालही कमी

अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : अख्ये महाराष्ट्र पिंजून काढले तरी गावाची लोकसंख्या कमी झाल्याचे एकही गाव आढळून येणार नाही. मात्र पवनी एकमेव गाव असे आहे ज्याची लोकसंख्या ५० हजारावरून २५ हजारावर आली. रोजगाराअभावी नागरिकांचे स्थलांतर झाले. त्यात विणकर समाज अगे्रसर आहे. गावाचा विकास करण्यासाठी पर्यटन हे एकमेव क्षेत्र खुले असल्याने पवनीच्या विकासाकरीता पर्यटन संजीवनी ठरू शकते.भंडारा जिल्ह्यातील सर्वात जूनी नगर परिषद असलेले पवनी हे मात्र अद्यापही ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जाचे आहे. १५० हून अधिक वर्ष लोटले १०० वर्षापूर्वी गावात नांदत असलेली समृध्दी नाहीसी झाली. पवनीचा विकास खुंटला. रोजगाराच्या संधी शिल्लक नाहीत. बेरोजगारी वाढली. आर्थिक उलाढाल कमी झाली, व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटला. परिणामी गावातील काही लोक श्रीमंत झाले असले तरी सामान्य जनता गरीबीच आहे.गावातील बहुसंख्यांकाची गरीबी दूर कशी होणार यावर चिंतन करण्याची राजकरण्याची ईच्छाशक्ती नाही. विकासाचे नावाखाली शासनाचा निधी अवास्तव वापरला जात आहे. त्यावर कुणाचा अंकुश नाही.पुरातत्व, ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन दृष्टीने पवनी गावाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. पुरातत्व विभागाने शोधलेला जगन्नाथ टेकडी खाली असलेला भव्य बौध्द स्तूप गावाचा महत्व वाढविण्यास पुरेशा आहे. परंतु प्रचार-प्रसार व पुन: उत्खनन झाल्याशिवाय भव्य बौध्द स्तूपाचे व गावाचे महत्व कसे वाढेल. ऐतिहासिक दृष्ट्या विचार केल्यास भोसले कालीन परकोट, भव्य प्रवेश द्वार व वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले दिवानघाट, ताराबाई घाट, वैजेश्वर घाट असे महत्वाचे स्थळ अस्थित्वात असले तरी दुर्लक्षित आहेत. धार्मिक दृष्टया विचार केल्यास गावात २५० हून अधिक मंदिर आहेत. एक मंदिर असलेल्या गावांचा विकास झाले.शेकडो मंदिर असूनही पवनीचा विकास का खुंटला? विदर्भातील अष्टविनायकात गणणा असलेले पंचमुखी (सर्वत्रोभद्र) गणेश मंदीर, स्वयंभू धरणीधर गणेश मंदिर, रांजीची भव्य गणेश मूर्ती सोबतच वैजेश्वर, निलकंठेश्वर, पालाळेश्वर, भुतेश्वर यासारखे शिवाचे मंदिर, मुरलीधराचे व जगन्नाथाचे एकमेव मंदिर, माता चंडीका, दुर्गा माता भंगाराम माता, एकविरा माता, कालका व ज्वाला माता असे देवींचे मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल रुख्मीनी मंदिर व टेंभेस्वामीचे नवनिर्मित मंदीर, धोबीतलाव मारोती, दर्गा परिसरातील मारोती, एकटांग्या मारोती असे हनुमानाचे मंदिर एवढेच नव्हे तर गधा देव आणि सुर्यदेव सुध्दा, नवनिर्मित गजानन महाराज मंदिर व साईबाबा मंदिर गावाचे धार्मिक महत्व दर्शविण्यासाठी पुरेशे आहेत.पर्यटन क्षेत्राचा विचार केल्यास वैनगंगा नदीपलीकडे सिंदूपरी (रुयाळ) येथे असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महासमाधीभूमी, राष्ट्रीय दर्जा प्राप्त असलेले इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य, कोरंभी डोंगरावरील महादेवाचे मंदिर असे स्थळ पर्यटकांना आकर्षित करुन पवनी गावाच्या विकासात भर घालू शकतात. परंतु लोकप्रतिनिधी मध्ये ईच्छा शक्तीचा अभाव असल्याने गोसेखुर्द प्रकल्प आहे.परंतु परिसरात सोयी-सुविधा व पर्यटकांना थांबेवेत असा बगीचा निर्माण होवू शकला नाही. उमरेड-पवनी-कºहांडला अभयारण्याकडे पर्यटकांचे लक्ष केंद्रीत झाले होते परंतु आशिया खंडात प्रसिध्द झालेला ‘जय’ व त्यापाठोपाठ ‘जयचंद’ वाघ अभयारण्याने गमावला.गोसेखुर्द प्रकल्पामुळे पवनी परिसरातील खेडे लांब अंतरावर पुनर्वसीत झाले त्याचाही विकासावर विपरीत परिणाम झाला. सोयी-सवलतीमध्ये कच्चा माल मिळत नाही. त्यामुळे विणकर समाज पवनीचा त्याग करुन स्थलांतरीत झाले. विकासाला संजीवनी देणारा एकच क्षेत्र खुला आहे, तो म्हणजे पर्यटन लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती जागृत करुन पर्यटन क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केल्यास विकासाला बळ मिळेल, यात शंका नाही.

टॅग्स :tourismपर्यटन