शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

पवनी, लाखांदूर तालुक्यातील दारू तस्करांचे कंबरडे मोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:26 AM

भंडारा : दारू तस्करीच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचे आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने कंबरडे मोडणार आहे. सीमावर्ती पवनी ...

भंडारा : दारू तस्करीच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्यांचे आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने कंबरडे मोडणार आहे. सीमावर्ती पवनी आणि लाखांदूर तालुक्यातून दररोज चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे पाट वाहत होते. शेकडो तरुण यात गुंतले होते. सायकलवर फिरणारे चारचाकी आलिशान वाहनाने फिरू लागले होते. महिन्याकाठी ५० ते ६० लाखांची उलाढाल यातून या दोन तालुक्यांत होती होती. आता दारूबंदी उठविल्याने दारू तस्कर सैरभर झाल्याचे दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघाडीवर होते. देशी, विदेशी आणि हातभट्टीची दारू विविध मार्गाने आणि वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यात खुलेआम पोहोचविली जात होती. पवनी तालुक्यातून सावरला, कन्हाळगाव आणि भुयारमार्गे ही दारू चंद्रपूर जिल्ह्यात बिनदिक्कत जात होती. मांगली, आसगाव, पवनी आणि भुयार येथून देशी दारूची खेप पोहोचवली जात होती. अनेकदा पोलिसांनी कारवाई केली, परंतु दारू तस्करीला आळा मात्र बसला नव्हता. चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या गावातून मोहाची गावठी दारू पोहोचविली जात होती. अनेक तरुणांनी तर यासाठी खास दुचाकी तयार केली होती.

लाखांदूर तालुकाही दारू तस्करीत मागे नव्हता. वैनगंगा नदीतीरावरील इटान, खैरणा, मोहरणा, गवराळा, टेंभरी, विहीरगाव आणि लाखांदूर येथून ही दारू चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये पोहोचविली जात होती. अनेकदा पायी नदी पार करून किंवा डोंग्याच्या साहाय्यानेही ही दारू तस्करी होत होती. दोनही तालुक्यांतून महिन्याकाठी ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल होत होती. सहज पैसा मिळत असल्याने बेरोजगार तरुण या व्यवसायात चांगलेच गुंतले होते. पोलिसांची नाममात्र कारवाई होत असल्याने सुरुवातीला रात्री होणारी दारू तस्करी अलीकडच्या काळात दिवसाही हाेऊ लागली होती. परंतु, आता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी शासनाने उठविल्याने या तस्करांचे कंबरडे मोडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातच दारू मिळणार असल्याने ही महागडी दारू घेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बॉक्स

सायकल ते आलिशान वाहनप्रवास

दारू तस्करीत गुंतलेले अनेक जण आता आलिशान चारचाकी वाहनाने फिरताना दिसून येत आहे. ज्यांची सायकल घ्यायचीही ऐपत नव्हती, ते आता दुचाकी आणि चारचाकी वाहनाने फिरताना दिसत आहे. सहज पैसा उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण वाईट मार्गाला लागले होते. रात्री ढाब्यावरील पार्ट्याही रंगत होत्या. गुन्हेगारी वाढल्याचे दिसत होते.

बॉक्स

पेटीमागे एक हजाराचा फायदा

दारू तस्करीत गुंतलेल्यांना एका पेटीमागे एक हजार रुपयांचा तत्काळ फायदा पोहाेचत असल्याची माहिती आहे. अनेक तरुण दुचाकीने दारूची खेप पोहोचवून देत होते. दारू पोहोचवली की, नगदी पैसे मिळत होते. पोलिसांचा तेवढा ससेमिरा चुकविला की, सहज पैसे मिळत होते. अनेक तरुण यातून पैसे कमावत होते. मात्र, वाममार्गाने आलेला पैसा पुन्हा त्याच मार्गाने जात होता.

बॉक्स

दुचाकीच्या पेट्रोलटाकीतूनही दारू वाहतूक

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकदा विविध उपाय केले होते. गत आठवड्यात पवनी पोलिसांनी एक दुचाकी पकडली, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला होता. पेट्रोलच्या टाकीत दारूचे पव्वे आढळून आले होते. तर, पेट्रोलची सुविधा दुसऱ्या बाजूने करण्यात आली होती, अशा अनेक दुचाक्या या व्यवसायात गुुंतल्या होत्या.

बॉक्स

आता मोर्चा वळणार रेती तस्करीकडे

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्याने दारू तस्करांना काम राहणार नाही. अल्पश्रमात पैसा कमावण्याची सवय लागल्याने ही मंडळी आता अस्वस्थ होणार आहे. रिकामे तस्कर आता रेती तस्करीत उतरण्याची दाट शक्यता आहे. पवनी आणि लाखांदूर तालुक्यांत वैनगंगा नदीचे प्रसिद्ध घाट आहे. सध्या ही तस्करी सुरू आहे. परंतु, या तस्करीपेक्षा दारूत अधिक पैसा मिळत असल्याने अनेकांनी आपला मोर्चा तिकडे वळविला होता. आता ही मंडळी पुन्हा रेती तस्करीत सक्रिय होणार आहे.