पवनी : अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेस तथा पवनी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नेताजी चौक (वैजेश्वर गेट) पवनी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर डॉ. प्रकाश देशकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून प्रकाश टाकताना म्हणाले, इंग्रजी राजवट भारतातून संपुष्टात आणण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंझार व्यक्तिमत्त्व होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय जनतेच्या मनात इंग्रजांच्या विरोधात चीड निर्माण केली. तसेच त्यांनी "तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुँगा" असे आवाहन करून इंग्रजांविरुद्ध लढण्यास भारतीयांना तयार केले. विकास राऊत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर विस्तृत माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत,अखिल भारतीय मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे,पवनी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर उरकुडकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, नगरसेवक गोपाल नंदरधने, राकेश बिसने, सेवादलाचे शहर अध्यक्ष रामचंद्र पाटील,विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भागवत आकरे, ब्रह्मदास बागडे,शशिकांत भोगे,अरुण मुंडले, योगेंद्र टेंभुरने, घोडेघाट, वैजेश्वर, नेताजी, विठ्ठलगुजरी वाॅर्डातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश पचारे तर मनोहर उरकुडकर यांनी आभार मानले.