जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकाची शुक्रवारी डाॅ. फुके यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विनानिकष नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. भंडारा तालुक्यातील डवा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांनी आपबीती सांगितली. अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार फुके यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. विनानिकष माेबदला देण्याची मागणी केली. काेराेना संकटामुळे शेतकरी डबघाईस आला असून माेठे नुकसान झाले असे सांगत नुकसान णलेल्या धानाची पेंडी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनाेद बांते, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, टेकराम पडाेळे, रंजना माेटघरे आदी उपस्थित हाेते.लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वादळासह आलेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने काेणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार डाॅ. परिणय फुके यांनी केली.
जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर आणि भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त धान पिकाची शुक्रवारी डाॅ. फुके यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन विनानिकष नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. भंडारा तालुक्यातील डवा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांनी आपबीती सांगितली. अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यानंतर आमदार फुके यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांची भेट घेतली. विनानिकष माेबदला देण्याची मागणी केली. काेराेना संकटामुळे शेतकरी डबघाईस आला असून माेठे नुकसान झाले असे सांगत नुकसान णलेल्या धानाची पेंडी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनाेद बांते, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते, टेकराम पडाेळे, रंजना माेटघरे आदी उपस्थित हाेते.