महाराष्ट्रात साक्षर भारत योजना अंतर्गत गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील ९३ तालुक्यातील ७३१८ ग्रामपंचायत अंतर्गत १४ हजार ६३० प्रेरक-प्रेरिका कार्यरत आहेत. या प्रौढ शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्त्वावर करण्यात आली. नियुक्तीनंतर गावागावात निरक्षरांना शिकविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. साक्षर भारत अभियान जानेवारी ३१ मार्च २०१८ पासून शासनाने बंद केले आहे. त्यामुळे या प्रेरक-प्रेरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नाही तर त्यांचे २२ महिन्यांचे मानधनसुद्धा देण्यात आले नाही.
थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत समाविष्ट करावे, दरमहा मानधन द्यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. निवेदन देताना प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सुजाता वंजारी, उपाध्यक्ष प्रतीक राऊत, सचिव हेमराज जांभुळकर, कार्यवाह मनोज रामटेके, सदस्य कविता कामळे, नांदेश्वर, राऊत, राणी, राजेश राखडे, लांजे, चिमणकर उपस्थित होते.