भंडारा : घरकुल पाहिजे असेल तर आधी आम्हाला पैसे द्या व प्रकरण मंजूर करून घ्या, असा प्रकार भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे पाहावयास मिळत आहे. यासंदर्भात येथील जवळपास ३५ लाभार्थींनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी लाभार्थींनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सिल्ली टोली येथे जवळपास ३५ च्या वर कुटुंबीय झोपडी बांधून राहत आहे. येथील नागरिकांची
परिस्थिती सन २००५ पासून घरकुलाचे प्रकरण प्रलंबित आहेत. यात विठ्ठल नीलकंठ शेंडे यांनी २००५ मध्ये झोपडी बांधून तेथे रहिवास सुरू केला. झोपडीवर ग्रामपंचायतीतर्फे कर आकारणी १५ वर्षांपासून करीत आहेत. असे असतानाही आनंदनगर सिल्ली टोली येथे सर्व ३५ कुटुंबीयांचे झोपडीवजा घर आहे. यासंदर्भात येथील लाभार्थींची ऑनलाइन पात्र घरकुल यादी मध्ये समावेश होता. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत या पात्र लाभार्थींना घरकुल देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. उल्लेखनीय म्हणजे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षमध्ये या लाभार्थींना पैशांची मागणी केली जात आहे. पैसे द्या व नंतर घरकुल मंजूर करून या असा जणू फतवाच काढला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात गंभीर समस्या व अडचणींचा लाभार्थींना सामोरे जावे लागत आहे. याप्रकरणी घरकुल लाभापासून पात्र यादीत नाव असतानाही वंचित का ? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व न्याय देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात विठ्ठल शेंडे, सुमन शेंडे, रामेश्वर शेंडे, मनोहर पेरे, सोमेश्वर शेंडे, भाऊराव केवट, अश्विनी गुरुवेकर, दामू बागडे, वसंता नंदुरकर, गुणाकर रत्नापुरे, होमदेव गभणे, शालू गिरेपुंजे, देवचंद बावनकुळे, हिरामण चाचेरे, कैलास बालबांपे, रवींद्र बावनकुळे, तुळशीराम भागडे, राजू पानबुडे, अनिल गिरेपुंजे, प्रकाश बावनकुळे, अमृत साखरवाडे, विजय देवळे, दुर्गा भुरे, गीता चव्हाण, सयाबाई वासनिक, अविनाश हुमणे, नाशिक चव्हाण, प्यारेलाल मेश्राम, रामदास मस्के, ग्यानीराम पाचोडे, काशिनाथ मेश्राम, ज्ञानेश्वर आकरे, गुणाकार ढोबळे, शंकर मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.