शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

जिल्ह्यातील धान उत्पादकांचे १०५ कोटींचे चुकारे थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचा विसर । ३० लाख क्विंटल खरेदीत अद्याप बोनसची रक्कम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गावर मात करीत शेतात पिकविलेला धान शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांचे १०५ कोटी ३५ लाख २७ हजार रुपयांचे चुकारे थकीत आहेत. कोरोना संकटाने घोषीत लॉकडाऊनमध्ये शेतकरी अडचणीत आला असून आतापर्यंत जिल्ह्यात खरेदी झालेल्या ३० लाख क्विंटल धान खरेदी झाला आहे. ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपयांचे चुकारे आधारभूत किमतीने देण्यात आले. मात्र शेतकºयांना अद्यापही वाढीव बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.भंडारा जिल्ह्यात ९० आधारभूत खरेदी केंद्रावर १५ एप्रिल पर्यंत ३० लाख ५२ हजार २१२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २९ लाख ३५ हजार ३९३ क्विंटल आणि अ ग्रेडचा १ लाख १६ हजार ८१८ रुपये धानाचा समावेश आहे. खरेदी झालेल्या धानाची किंमत ५५४ कोटी २१ लाख १ हजार ९२० रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४४८ कोटी ८५ लाख ७४ हजार ८४४ रुपये वळते करण्यात आले आहे. तर १०५ कोटी ३५ लाख २७ हजार ७५ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. गत महिनाभरापासून कोरोना संसर्गाचे संकट घोंगावत आहे. संचारबंदी आणि लॉकआऊट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अशा परिस्थितीत शेतकºयांना पैशाची गरज आहे. मात्रलॉकडाऊनमध्ये शासनाला शेतकऱ्यांचा विसर तर पडला नाही ना अशी शंका येत आहे.सर्वसाधारण धान १८८५ रुपये आणि अ ग्रेडचा धान १८३५ रुपये प्रती क्विंटल दराने आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासनाने बोनस आणि वाढीव दर असा २५०० रुपये धानाचा भाव झाला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ आधारभूत किमतीनेच चुकारे करण्यात आले. त्यामुळे वाढीव दराचे कोट्यवधी रुपये शासनाकडे बाकी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना धानाची वाढीव दरासह रक्कम अदा करावी अशी मागणी आहे.९८ हजार शेतकरीजिल्ह्यात १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला प्रारंभ झाला. ९० आधारभूत केंद्रावर धान खरेदी करण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार १२८ शेतकऱ्यांनी आपला धान शासनाला विकला. त्यात भंडारा तालुक्यातील ५ हजार २९६ शेतकरी, मोहाडी १४ हजार ५३२ शेतकरी, तुमसर १६ हजार ९८५ शेतकरी, लाखनी १५ हजार ३९३ शेतकरी, साकोली १५ हजार १६३ शेतकरी, लाखांदूर २१ हजार २७१ शेतकरी, पवनी ९ हजार ३८८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व शेतकरी आता वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने तात्काळ या शेतकऱ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे धान खरेदीला ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना धान विकणे अडचणीचे जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी