विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : मजुरांची मजुरी भंडारा येथील एका संस्थेच्या नावाने उचलणे, रोपवन वाटिकेतील नोंदवहीत बोगस मजुरांचा भरणा, एकाची परवानगी असताना दोन डिझेल इंजिन खरेदी करणे, सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही लक्षावधी रूपयांच्या अनुदानाचे रोखलेखा सादर न करणे, रोपे वाहतुक अंतरात जास्त अंतर दाखविणे आदींबाबत भिवखिडकी रोपवन वाटिकेत गैरप्रकार घडल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी चमू नेमण्यात आली आहे. परिणामी गैरप्रकार झाल्याच्या बाबीला बळ मिळत आहे.भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून यासाठी आर. एम. विधाते विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण भंडारा तसेच रेश्मा व्होरकाटे सहायक वनसंरक्षक भंडारा आर. एन. धरमशहारे, सबिना बन्सोड, तसेच टी. जी. चवळे ही चमू तपासणी करणार, अशी माहिती आहेअन्य गावातील रोपवन वाटिकेतील शेकडो मजूर वर्ग व ग्रामस्थांनी चौकशीसाठी कंबर कसली आहे. तसेच मजुरांची मजुरी जर तात्काळ मिळाली नाही व संबंधित भ्रष्ट अधिकारी यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली तर प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.सामाजिक वनीकरण विभागाला दरवर्षी लाखोंचा निधी येतो आणि त्याची विल्हेवाटही संगनमताने लावली जाते, अशी मजुरांमध्ये चर्चा आहे. असाच प्रकार भिवखिडकी रोपवन वाटिकेत झाल्याचे मजुरांचे म्हणने आहे.भंडारा येथील एका संस्थेने भिवंखिडकी रोपवण वाटिकेत काम करायला मजुरांचा पुरवठा केला होता, असे दाखवून लाखो रुपयांची उचल लागवड अधिकाºयांनी केल्याचा आरोप आहे. रोपवण वाटिकेत खºया अर्थाने ज्यांनी मेहनत केली ऊन पावसात राबले त्यांनाच अद्याप मजुरी मिळालेली नाही.आजपासून होणार चौकशीला प्रारंभभिवखिडकी रोपवन वाटिकेतील प्रकरणाची सखोल चौकशी करून मजुरांना तात्काळ मजुरीचे पैसे देने व दोषी अधिकारी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजेन्द्र ब्राम्हणकर, सुरेन्द्र आयतुलवार तसेच अड्याळ व परिसरातील भिवखीडकी रोपवण वाटिकेत काम करणाºया मजुरांनी मागणी केली होती. सोमवारला या प्रकरणाची चौकशी होणार अशी माहिती सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनाधिकारी आर. एम. विधाते यांनी दिली. जिल्ह्यातील अन्य रोपवण वाटिकेत असाच प्रकार घडला का असावा आणि त्यामुळे ही चौकशी उच्च स्तरावरून होत नसावी असाही कयास आता मात्र लावण्यात येत आहे यासाठी आता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करतात याकडेही जनतेचे लक्ष लागून आहेत.
रोपवन वाटिकेतील नोंदवहीत बोगस मजुरांचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM
भिवखिडकी रोपवाटिकेतील रेती, माती तसेच तिथे लागणाऱ्या शेणखतातही घोळ झाल्याची मजुरांमध्ये चर्चा होती. यात १५ दिवसाआधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर व मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांना तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून यासाठी आर. एम. विधाते विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण भंडारा तसेच रेश्मा व्होरकाटे सहायक वनसंरक्षक भंडारा आर. एन. धरमशहारे, सबिना बन्सोड, तसेच टी. जी. चवळे ही चमू तपासणी करणार, अशी माहिती आहे
ठळक मुद्देप्रकरण भिवखिडकी रोपवन वाटिकेतील : मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता