लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रत्येक गावाची आता हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असून ग्रामपातळीवरील स्थानिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. हागणदारीमुक्त गावात शाश्वत स्वच्छतेसाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यामुळे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांनी लोकसहभागातून शाश्वत स्वच्छतेसाठी काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सभापती प्रेम वनवे यांनी केले.शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित स्वच्छता पंधवडयाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, सरपंच मोरेश्वर गजभिये यांच्या उपस्थितीत स्वच्छता पंधवडयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी मिलींद मोटघरे, डॉ. माधुरी माथुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना सलाम, डॉ.रेखा रामटेके, डॉ.श्रीकांत आंबेकर, डॉ.भगवान मस्के, प्रा.विजय रामटेके, अजय गजापुरे, गजानन भेदे, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, आरोग्य सहायक विनोद मेश्राम, देवानंद बोरूले, प्रिती गायधने, वैशाली लेपसे, सिंधू वंजारी, अनिता चाचेर, आरोग्यसेवक प्रकाश मेश्राम, मंगेश वासनिक उपस्थित होते.यावेळी डॉ.मिलींद मोटघरे यांनी स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता ते सिध्दी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली. स्वच्छता प्रत्येक व्यक्तीला का? आवश्यक आहे, स्वच्छतेमुळे परितर्वन कसे होते व स्वच्छता पंधरवडापासून शाश्वत स्वच्छता कशी राखता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.श्रीकांत आंबेकर यांनी, स्वच्छता पंधरवड्यात जनजागृतीसाठी राबवावयाच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी यांच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने १ ते १५ एप्रिल या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छताजिल्हास्तरीय स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला. त्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना सलाम, रेखा रामटेके यांच्या नेतृत्वात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा, गट प्रवर्तक व कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ केला. या आरोग्य केंद्राअंतर्गत १८ ग्रामपंचायती व २२ गावांचा समावेश असून त्या ठिकाणी स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना सलाम यांनी सांगितले.स्वच्छतेकडून संकल्पसिद्धीकडे१ ते १५ एप्रिल दरम्यान स्वच्छता पंधरवडा-स्वच्छतेकडून सिद्धीकडे हा कार्यक्रम आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. स्वच्छता पंधरवडयात ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हागणदारीमुक्त गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी जनजागृती करणे, शाळा व आंगणवाडींची स्वच्छता करणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, हातधुणे, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीच्या सहभागाने ग्रामस्वच्छता करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थास्तरावर परिसर स्वच्छता, जैविक कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत रूग्ण व कर्मचाºयांमध्ये जनजागृती करणे, आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.रासेयो विद्यार्थ्यांचा सहभागशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमात पेट्रोलपंप येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा.विजय गणवीर यांच्या नेतृत्वात आरोग्य केंद्राचे कर्मचारी व रासेयो विद्यार्थ्यांनी सफाई करून स्वच्छतेचा संदेश दिला. जिल्ह्यातील अनेक गावात रासेयो विभागाच्या विद्यार्थ्यांनी हागणदारीच्या परिसरात स्वच्छता केली आहे. आता स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमात जिल्हाभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
शाश्वत स्वच्छतेसाठी लोकसहभाग आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 11:52 PM
प्रत्येक गावाची आता हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असून ग्रामपातळीवरील स्थानिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. हागणदारीमुक्त गावात शाश्वत स्वच्छतेसाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे.
ठळक मुद्देप्रेम वनवे यांचे आवाहन : शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून स्वच्छता पंधरवडा शुभारंभ