शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

आॅनलाईन सातबारा नोंदणीची टक्केवारी शतकपूर्तीकडे

By admin | Published: July 14, 2017 12:57 AM

आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याच्या मोहिमेत भंडारा जिल्हा प्रशासन आघाडीवर असून त्याची टक्केवारी ९९.२९ टक्के इतकी आहे.

चावडी वाचनाचे उद्दिष्टही पूर्ण : पीक पाहणीत ५,८११ नोंदीइंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याच्या मोहिमेत भंडारा जिल्हा प्रशासन आघाडीवर असून त्याची टक्केवारी ९९.२९ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे आता शेतकरी व नागरिकांना कुठल्याही ठिकाणाहून आॅनलाईन सातबारा मिळू शकणार आहे. तश सोय करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील ८७६ गावांमध्ये चावडी वाचन हा उपक्रम १५ मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात आला. यात शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात १२ जुलै २०१७ पर्यंत ५ लक्ष ७५ हजार ६८४ पैकी ५ लक्ष ७१ हजार ५९१ सातबारा आॅनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. पीक पाहणीचा समावेशआॅनलाईन सातबारा अंतर्गत पीक पाहणी दुरूस्त करून एकूण ५,८११ प्रकरणे दुरूस्त करण्यात आले आहेत. एकूण सातबारांच्या नोंदणीपैकी १८ हजार २७३ सातबारा बंद अवस्थेत असल्याची नोंद आहे. नाव, आडनावात बदल, खरेदी-विक्रीच्या नोंदी अशा अन्य त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यापैकी बरीच कामे झाली असून ३१ जुलै २०१७ पर्यंत उर्वरित सातबारा आॅनलाईन नोंदणीकृत करण्याचे कार्य सुरू आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये साफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याची बाब समोर आली होती. मात्र भंडारा जिल्हा या बाबीला अपवाद ठरला आहे. यापूर्वी लिखित सातबारे देण्याचा कार्यक्रमाला स्थगिती देण्यात येऊन आॅनलाईन सातबारा देण्याकडे जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली आहे. टप्याटप्याने आॅनलाईन सातबारा नोंदणीकृत करण्याचे कार्य अजूनही सुरू आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलैपर्यंत सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ध्येय असून आॅनलाईन सातबारा वाटप करण्याच्या हेतूने कार्य सुरू आहे.-सुजाता गंधे,उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.