लाखांदूर : बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरतर्फे भागडी येथे तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन सरपंच कोमल नाकतोडे यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर रक्षक होते. यावेळी ताराचंद मातेरे, जगदीश मेश्राम, भाऊराव तायवाडे, तेजराम मोहोरिया, अशोक भजने, रामकृष्ण वांढरे उपस्थित होते.यावेळी पुरुषोत्तम बगमारे, डॉ.बी.पी. कोचे, प्रविण गजभिये, अभियंता सोनकुमार, प्रदीप भावे यांनी मार्गदर्शन केले. ग्यानचंद जांभुळकर यांनी अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाशी नाते जोडा यावर मार्गदर्शन केले. संचालन प्रशांत वरंभे यांनी केले. शुभम बोरकर यांनी आभार मानले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्ष डॉ.बी.पी. कोचे, उद्धव रंगारी, प्राचार्य अशोक भजने, प्रा.संजय मगर यांनी मार्गदर्शन केले. संचालन अजित वैद्य यांनी तर आभारप्रदर्शन अमर प्रधान यांनी केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिराचे आयोजक बहुजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी शिबिराचा उद्देश सांगताना म्हणाले, समाजात ज्या वाईट घटना घडतात, अंधश्रद्धा आहेत याला कारण नैतिकतेची कमतरता, विज्ञाननिष्ट दृष्टीकोणाचा अभाव कारणीभूत आहे. समाजात संविधानिक नैतिकता वाढीस लावून विज्ञाननिष्ट समाज बनवून संविधान संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहे. भागडी येथील जनतेला डॉ.बी.पी. कोचे यांनी रोज सकाळी योगाभ्यास, प्राणायाम, ध्यान, विपश्यनेचा फायदा झाला. शिबिरासाठी बहुजन विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते अमर प्रधान, होमकांत उपरीकर, रवी फुंडे, नरेंद्र दिवटे, जगदीश मेश्राम, अशोक भजने यांच्यासह बहुजन प्रबोधन मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
भागडी येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर
By admin | Published: March 19, 2017 12:25 AM