शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पेट्रोल दरवाढीमुळे नागरिकांमध्ये ‘आक्रोश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:26 PM

सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे.

ठळक मुद्दे८४ रूपये प्रती लिटर : गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम, नागरिक म्हणतात, पेट्रोल शंभर रूपये लिटर करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे.यापूर्वी वर्षातून किमान दोन वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ व्हायची. त्या तुलनेत सद्यस्थितीत सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मागील काही महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दरात नित्याने वाढ करीत आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे.१६ जून २०१७ ला पेट्रोलचे दर ७६.३४ पैसे होते. हे दर आता अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर चक्क ८४ रूपयांवर पोहचले आहे. या अकरा महिन्यात पेट्रोलच्या किमतीत आठ रूपयांनी वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचे दर शंभरी तर गाठणार नाही ना? अश भीती वाहनचालकांना वाटू लागली आहे. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम, हिंदूस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून नागरिकांना वाहनांकरिता पेट्रोल व डिझेलचा पुरवठा करण्यात येत आहे. यासह अन्य कंपन्यांच्या पेट्रोलपंपाच्या माध्यमातून पेट्रोलची सुुविधा उपलब्ध आहे. पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने वाहनधारकांची एकप्रकारे लुट सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये आहे.पेट्रोलच्या दरवाढीचा चढता आलेखजानेवारी महिन्याच्या १ तारखेला पेट्रोलचे दर ७८.२३ रुपये प्रतीलिटर होते. डिझेलच्या किमतीत तब्बल ७.२१ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल १ जानेवारीला ६२.८० रु. प्रतीलिटर होते. त्यात वाढ होऊन ६६.६६ रुपये भाववाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा भाववाढ झाली. पंधरवाडापूर्वी सोमवारच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने दिसूून आले. सोमवारला ८४.०४ पैसे पेट्रोलचे दर होते. त्यात डिझेलच्या दरातही चांगलीच वाढ दिसून येत आहे.सोअल मीडियावर फिरतोय संदेशदुसरीकडे सोशिअल मीडीयावर पेट्रोल भरताना नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले जात आहे. ५०, १००, १५० तथा २०० रूपयांचे पेट्रोल न भरता ते ३०, ४०, ६०, ७०, ८०, ९०, ११०, १२०, १३०, १४० रूपये अशा आकड्यांमध्ये भरावे. ठोक आकड्यांची सेंटींग होत असल्याने ग्राहकांना पेट्रोल कमी मिळत असते, अशी माहिती असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपवर बघायला मिळत आहे. काहीही असो नागरिक भाववाढीला घेऊन चांगलेच संतापले आहेत.जिल्ह्यात ४६ पट्रोलपंपजिल्ह्यात ४६ पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपवर महिनाभरात अंदाजे सुमारे ७ लाख लिटर पेट्रोल व ३० लाख लिटर डिझेल विक्री होते. दरवाढीत लाखो रुपयांचा फायदा होतो तर याचा सर्वसामान्यांना फटका बसतो.