शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पेट्रोलपंपांची तपासणी ‘शुन्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:27 AM

राज्यात ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. भंडारा जिल्ह्यात ५२ पेट्रोलपंप असतानाही एकाही पंपांची साधी तपासणी झालेली नाही.

जिल्ह्यात ५२ पंप : अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञइंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. भंडारा जिल्ह्यात ५२ पेट्रोलपंप असतानाही एकाही पंपांची साधी तपासणी झालेली नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तपासणी चमुने कारवाई केली; मात्र भंडारा जिल्हा याला अपवाद ठरल्याने सर्व कारभार ‘आलबेल’ असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल चोरीच्या प्रकारासह आवश्यक सुविधांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्यात सात तालुके असून एकूण ५२ पेट्रोलपंप आहेत. या पंपावरून पेट्रेल आणि डिझेलची विक्री होते. या विक्री दरम्यान पेट्रोल आणि डिझेल कमी देण्याची किंवा चोरीची प्रकरणे घडत असतात, परंतू कुणीही तक्रार करीत नसल्याने कारवाई शुन्य आहे. काही जागरूक नागरिकांकडून विरोध होत असला तरी समान्यजण साथ देत नसल्याची बाबही समोर आली आहे. दुसरीकडे नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव, हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. भंडारा नागरिकांना पंपावर आवश्यक सुविधांबाबत विचारणा केली असता, त्यांना मोजक्याच बाबी माहीत असल्याचे दिसून आले. शासनाच्या निर्णयानुसार पेट्रोल पंपावर एकूण ११ प्रकारच्या सुविधा असणे आवश्यक आहे. या सुविधा कोणत्या या संदर्भात मात्र एकाही नागरिकाला परीपुर्ण माहिती नसल्याचे दिसून आले. पंपावर असलेल्या सुविधा म्हणजे नागरिकांचे अधिकार असतानाही या अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.भंडारा तालुक्यात १४ पेट्रोल पंप भंडारा तालुक्यात एकूण १४ पेट्रोलपंप आहे. यातील काही पंपांवर आवश्यक सुविधा आहे तर काही पंपांवर त्या नसल्याचे दिसून आले आहे. काही पेट्रोलपंपावर सुविधा देण्यासंदर्भात बांधकाम सुरू आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, वाहनात नि:शुल्क हवा, लॅव्हेटरीची सुविधा, पार्किंगची व्यवस्था आदी सुविधा असल्या तरी मिळणारे पेट्रोल शंभर टक्के शुद्ध व मोजमापानुसार आहे की नाही याची हमी नागरिकांमध्ये दिसून आली नाही. बहुतांश पंपांमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था आहे. जिल्ह्यात आयओसीएलचे १७, बीपीसीएलचे १४, एमपीसीएलचे १८, रिलायंस कंपनीचे दोन व इस्सार कंपनीचा एक असे एकूण ५२ पेट्रोलपंप आहेत. पेट्रोल पंपांच्या तपासणीबाबत राज्य शासनाकडून कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. अन्य जिल्ह्यात तपासणी झाली असेल तर ती पोलिस प्रशासनाने केली आहे.- रमेश भेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा.शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सुविधा पेट्रोल पंपावर देण्यात येतात. शासनाकडून किंवा सबंधित विभागाकडून पंपांच्या तपासणी संदर्भात कुठलेही लिखित पत्र मिळालेले नाही. - सुभाष गुर्जर, अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल असोसिएशन भंडारा.