शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

सुदृढ आरोग्यासाठी फार्मासिस्ट खरा जीवलग मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:56 PM

दुषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे. यामुळे अनेकांना व्याधीने ग्रासले आहे.

ठळक मुद्देप्रभाकर कळंबे : फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन

आॅनलाईन लोकमतभंडारा : दुषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे. यामुळे अनेकांना व्याधीने ग्रासले आहे. अशावेळी प्रत्येक नागरिकांनी डॉक्टर व फार्मसिस्टचा सल्ला घेवूनच औषधोपचार करावा. डॉक्टरला अनेकजण देव मानतात तसेच फार्मसिस्ट हे जीवलग मित्र म्हणून त्याचा सल्ला घेवून आरोग्य सुदृढ ठेवावे असे प्रतिपादन मुख्य औषध निर्माण अधिकारी प्रभाकर कळंबे यांनी व्यक्त केले.फार्मसी सप्ताहानिमित्त वरठी येथील अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी येथे पार पडलेल्या ५६ व्या राष्टÑीय फार्मसी सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर युनिव्हरसिटी डिपार्टमेंट आॅफ फार्मास्युटीकल सायन्स कॅम्पसचे सहायक प्राध्यापक डॉ. प्रकाश इटनकर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी अरविंद बावणकर, प्रभाकर कळंबे, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीचे (बी.फार्मसी) प्राचार्य डॉ. एस. पी. वाते, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीचे (डी. फार्मसी) चे प्राचार्य लोहे, कार्यक्रम समन्वय प्रा. कुमुदीनी धुर्वे, प्रा. दिनेशकुमार लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरवर्षी राष्टÑीय फार्मसी सप्ताह देशभरात साजरा करण्यात येतो. योग्य प्रकारे औषधी घेतल्यास आरोग्य चांगले राहते. मात्र त्याचा दुरुपयोग केल्यास औषध विषारी बनु शकतात. म्हणून औषधांबद्दल पुरेपुर माहिती प्राप्त व्हावी याअनुषंगाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सप्ताहानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २० पदविका विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी डॉ. प्रकाश इटनकर यांनी फार्मसीस्ट आणि त्यांच्याकडील उपलब्ध संधी व आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एस. पी. वाते यांनी फार्मसीस्ट कशाप्रकारे मदत करु शकतो. याबद्दल मार्गदर्शन करुन व्यवसायाचा मान उंचावण्यासाठी त्यांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी कुमुदिनी धुर्वे यांच्यासह अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. वादविवाद स्पर्धेत शांताबाई पाटील इन्स्टीट््युट आॅफ डिप्लोमा इन फार्मसीची मेघा बजाज हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर अनुराग कॉलेज आॅफ फार्मसीच्या पराग भोयर याने द्वितीय तर तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजी कॉलेज आॅफ फार्मसीच्या मयुर चवरे याने पटकाविला. यावेळी फार्मसीस्टचे स्थान समाजात अढळ राहावे यासाठी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आसीफ शेख यांनी केले तर आभार प्राचार्य सचिन लोहे यांनी मानले.बावनकर, कळंबे यांचा सत्कारजिल्हा सामान्य रुग्णालयात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अरविंद बावणकर व जिल्हा परिषद येथे मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रभाकर कळंबे यांनी फार्मसी व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केले आहे. या दोघांच्या कार्याची दखल घेवून फार्मसी सप्ताहाच्या कार्यक्रमात त्यांचा मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.