शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पिक विमा योजना ठरली फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 12:56 AM

प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही.

ठळक मुद्देपटोले यांचा आरोप : वंचित शेतक-यांना मोबदला द्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना सक्तीची केल्याने शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. भंडारा जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आणि दुष्काळाचा ज्या शेतकऱ्यांना फटका बसला, अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे काढून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि शेतकऱ्यांनी लुट होऊ देणार नाही, असा ईशारा माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.यावेळी ते म्हणाले, भंडारा जिल्ह्यात ५६,०६२ शेतकऱ्यांनी ५४,९५३ हेक्टर क्षेत्रातला पिक विमा काढला होता. त्यापोटी चार कोटी २८ लाख ४३ हजार रूपयांची रक्कम पिक विमा कंपनीकडे भरली. यावर्षी दुष्काळ जाहिर होऊनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. एकीकडे सक्तीने पैसे वसुल करायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लाभ द्यायचा नाही, असे शासनाचे फसवे धोरण असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.यावर्षी राज्य शासनाने तुर डाळीला ५,६०० रूपये समर्थन मुल्य जाहिर केले आहे. परंतु आधारभुत केंद्र सुरू न केल्यामुळे या शेतकऱ्यांना २८०० ते ३००० रूपये इतक्या कमी भावाने डाळ विकावी लागत आहे. तत्कालीन युपीए सरकारने सरसकट कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले होते. पंरतु भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही राज्य शासन अधिभार आकारुन जनतेची पिळवणूक करीत आहेत. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारुची दुकाने बंद झाल्याचे कारण सांगुन महसुलात येणारी तुट भरुन काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार तर दुष्काळ जाहिर केल्याचे कारण सांगुन अधिभार आकारला होता.आता दारूची दुकाने सुरू होऊनही पेट्रोलवरील अधिभार कमी करण्यात आला नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. एकीकडे शासन आरक्षणाला हात लावणार नाही असे सांगते आणि दुसरीकडे नोकरी भरती करत नाही. त्यामुळे आरक्षणच राहिले कुठे? असा सवाल करून बेरोजगारांना काम मिळू न देणारे हे सरकार असल्याचा आरोपीही नाना पटोले यांनी केला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले