मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचे स्वप्न पाहणाºया रेल्वेत तुमसर टाऊन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे तयार झाले आहे. यासमोर उपजिल्हा रुग्णालय व नागरिकांची वस्ती आहे. १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान रेल्वे प्रशासन स्वच्छ रेल, स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करीत आहे. केवळ कागदावर येथील स्वच्छता दिसत असून स्वच्छता पंधरवडा उपक्रमाचे धिंडवडे येथे निघत आहे.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे तुमसर शहरात रेल्वे स्थानक आहे. रेल्वे प्रशासन अंतर्गत रेल्वेचा रिकामा भूखंड आहे. रिकाम्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात जागोजागी कचºयाचे ढिगारे तयार झाले आहेत. सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयासमोरील रेल्वेच्या संरक्षण भिंतीला लागूनच कचºयाचे ढिगारे तयार झाले आहे. हा मार्ग रहदारीचा असून समोर लोकांची घरे आहेत. कचरा कुजल्याची दुर्गंधी येथे नेहमीच येते. मागील अनेक वर्षापासून हा भूखंड रिकामा आहे. खोलगट भाग असल्याने तिथे पाणी साचले राहते. इतर खुरट्या वनस्पती येथे वाढल्या आहेत. रेल्वे प्रशासनाचे या रिकाम्या भूखंडाकडे कायम दुर्लक्ष दिसत आहे. १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्वच्छ रेल, स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छतेची शपथ घेतली आहे. हर दिन स्वच्छता की ओर, भारतीय रेल मना रहा है, स्वच्छता पखवाडा अशी शपथ घेऊन स्वच्छ रेल्वे स्थानक स्वच्छ रेल्वे गाडी, रेल्वे स्थानक परिसर, स्वच्छ आहार, स्वच्छ स्पर्धा अशा घोषवाक्यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. वास्तविक स्थिती येथे मात्र वेगळीच आहे. तुमसर शहरातील रेल्वे प्रशासनावर मोठे भूखंड रिकामे पडून आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही. उलट येथे शहराचा भाजीबाजार व्यवस्थीत भरू शकतो. परंतु रेल्वे प्रशासन ते देण्यास इच्छूक नाही. शहराच्या आरोग्याला कचरा ढिगाºयामुळे धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे.
रेल्वेच्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:29 PM
जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचे स्वप्न पाहणाºया रेल्वेत तुमसर टाऊन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे तयार झाले आहे.
ठळक मुद्देतुमसर रेल्वे स्थानक परिसरातील प्रकार : स्वच्छ रेल-स्वच्छ भारत पंधरवड्याचा फज्जा